Physically Abuse Minor Girl Saam Tv
क्राईम

Kalyan Crime News: तहान लागल्याने पाणी प्यायला गेली, नराधमानं संधी साधली; कल्याणमध्ये अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

Physically Abuse Minor Girl: कल्याणमध्ये एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी बाजारपेठ पोलिसांनी नराधमाला बेड्या ठोकल्या आहेत.

Rohini Gudaghe

अभिजित देशमुख, साम टिव्ही कल्याण

कल्याणमध्ये एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी बाजारपेठ पोलिसांनी नराधमाला बेड्या ठोकल्या आहेत. एका बारा वर्षीय अल्पवयीन (Physically Abuse Minor Girl) मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घृणास्पद घटना कल्याणमध्ये उघडकीस आली आहे. या घटनेमुळे शहरामध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

याप्रकरणी कल्याण बाजारपेठ पोलिसांनी अकदस चंदू नावाच्या नराधमाला अटक केली आहे . धक्कादायक म्हणजे अकदसने वर्षभरापूर्वी देखील एका अल्पवयीन मुलीसोबत असा प्रकार केला होता. या नराधमाविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं (Physically Abuse Minor Girl In Kalyan) आहे.

कल्याणमध्ये राहणारी एक बारा वर्षीय अल्पवयीन मुलगी रात्री साडे सात वाजण्याच्या सुमारास दुकानात केक घेण्याकरता गेली होती. तिला तहान लागली म्हणून ती मुलगी जवळच पाणी पिण्यासाठी (Kalyan Crime News) गेली. तेवढ्यात तिच्या पाठीमागून एक व्यक्ती आला. त्याने त्या मुलीचे तोंड दाबले. तिला जबरदस्तीने एका ठिकाणी घेऊन गेला. त्याने या मुलीसोबत अतिप्रसंग करायला सुरुवात केली.

या प्रकारामुळे घाबरलेल्या पीडित मुलीने आरडाओरड सुरू केली. त्यामुळे नराधमाने तेथून पळ काढला. त्यानंतर मुलीने देखील तेथून पळ काढत घर गाठले. अकदस चंदू असं, या नराधमाचं नाव आहे. पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी या प्रकरणी कल्याण बाजारपेठ पोलीस ठाण्यात तक्रार (Crime News) नोंदवली आहे. या तक्रारीनुसार पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल केला आहे. तसंच अकदस चंदू या आरोपीला बेड्या ठोकल्या. धक्कादायक म्हणजे आरोपीचा खाद्यपदार्थ विक्रीचा व्यवसाय आहे. त्याने अकदस चंदू याने वर्षभरापूर्वी देखील एका मुलीसोबत असाच प्रकार केल्याचे देखील उघडकी आलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पँटची चैन उघडली अन्..., ट्रेनमध्ये तरुणीकडे पाहून तरुणाचं अश्लील कृत्य; VIDEO पाहून तुम्हालाही येईल राग

Maharashtra Live News Update: अमित शाह यांच्या पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या झाडाझडतीत एकाकडे सापडली पिस्तुल

Fake Charger: मोबाईल चार्जर खरे आहे का बनावट? खरेदी करताना ‘हे’ तपशील नक्की तपासा

Deepika Padukone Fitness: प्रेग्नेसीनंतर दीपिका पादुकोण इतकी फिट कशी? पाहा आताचे नवीन फोटो

Bank Rule: ग्राहकांना दिलासा! किमान बॅलेंस नसेल तरीही भरावा लागणार नाही दंड; या बँकांचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT