Kalyan Crime News Saam Digital
क्राईम

Kalyan Crime News: वाद सोडवायला गेलेल्या दोघा भावांना मारहाण करत लुटलं, कल्याणमधील धक्कादायक घटनेने खळबळ

Kalyan Crime News: वाद सोडवायला गेलेल्या तरुणासह त्याच्या भावाला तडीपार गुंड आणि त्याच्या साथीदाराने मारहाण करत लुटल्याची धक्कादायक घटना कल्याण आडीवली परिसरात घडली आहे. मानपाडा पोलिसांनी या प्रकरणी सोहेल बेग या तडीपार गुंडाला बेड्या ठोकल्या आहेत.

Sandeep Gawade

Kalyan Crime News

वाद सोडवायला गेलेल्या तरुणासह त्याच्या भावाला तडीपार गुंड आणि त्याच्या साथीदाराने मारहाण करत लुटल्याची धक्कादायक घटना कल्याण आडीवली परिसरात घडली आहे. मानपाडा पोलिसांनी या प्रकरणी सोहेल बेग या तडीपार गुंडाला बेड्या ठोकल्या आहेत. तर त्याचा साथीदार फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, कल्याण पूर्व येथील आडिवली परिसरात वाद सुरू होता. दरम्यान बाजूलाच असलेला एक तरुण आणि त्याचा भाऊ हा वाद सोडवण्यासाठी गेले होते. मात्र वाद सोडवायला गेलेल्या या दोघा भावांनाच मारहाण करण्यात आली. तसेच त्यांना लुटण्यातही आले आहे. याप्रकरणी विजय यादव नावाच्या व्यक्तीने मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करत शोध सुरू केला.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दरम्यान याप्रकरणी मानपाडा पोलिसांनी शोध सुरू केल्यानंतर सोहेल करीम बेग हा पोलिसांच्या हाती लागला. त्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. तर याप्रकरणातील बेगचा साथीदार फरार असून पोलिसांनी त्याच्या शोध सुरू केला आहे. धक्कादायक म्हणजे सोहेल बेग हा तडीपार आहे त्यानंतर पण तो या परिसरात फिरत होता. मानपाडा पोलीस सोहेलला कोर्टात हजर करणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासोबत माझे चांगले संबंध- खासदार अशोक चव्हाण

उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला, पत्नीला विषारी औषध पाजल्याचा आरोप | Buldhana crime

Valsad Accident: लग्नाला जाताना काळाचा घाला, ३० जणांना घेऊन जाणारी व्हॅन उलटली, ६ जणांचा जागीच मृत्यू

Shaktipeeth Highway: शक्तीपीठ महामार्ग जाणार तिथे रातोरात फुलवल्या आंब्याचा बागा, नेमकं कारण काय?

Bariatric surgery: लठ्ठपणा कमी करण्याच्या शस्त्रक्रियेची गरज कधी असते? डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती

SCROLL FOR NEXT