ATM Crime Saam tv
क्राईम

Jharkhand News: ATM मधून 800 रुपये काढायचे होते, पण नंतर घडलं असं की रागानं फोडूनच टाकला, नदीत फेकला

Jharkhand Crime News: झारखंडमध्ये एक विचित्र घटना घडली आहे. चक्रधरपूरमध्ये एटीएम मशीनची तोडफोड करण्यात आली आहे. एका माथेफिरूनं एटीएममधून पैसे मिळाले नाहीत म्हणून मशीनची तोडफोड केली आणि त्याचे पार्ट नदीत फेकून दिले.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Jharkhand A Man Threw ATM Machine In River:

झारखंडमध्ये एक विचित्र घटना घडली आहे. चक्रधरपूरमध्ये एटीएम मशीनची तोडफोड करण्यात आली आहे. एका माथेफिरूनं एटीएममधून पैसे मिळाले नाहीत म्हणून मशीनची तोडफोड केली आणि त्याचे पार्ट नदीत फेकून दिले. (Latest News)

झारखंडमधील चक्रधरपूर येथील रेल्वे उड्डाणपुलाजवळील टाटा इंडिकॅश एटीएममध्ये ही घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी हैदर नावाचा एक तरूण एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेला होता. त्याने एटीएम कार्ड मशीनमध्ये टाकले आणि ८०० रुपये काढण्याची प्रक्रिया पूर्ण केली. त्यानंतर अचानक एटीएमची लाइट गेली आणि मशीन बंद पडले. त्यामुळे पैसे बाहेर आले नाही. मात्र, हैदरला पैसे क्रेडिट झाल्याचा मेसेज आला. हैदरच्या बँक खात्यातून पैसे वळते झाले. एटीएममधून प्रत्यक्षात त्याच्या हाती पैसे आले नाहीत. त्यामुळे हैदरला खूप राग आला. रागाच्या भरात त्याने एटीएम मशीन फोडले. त्यानंतर एटीएम मशीनचे वेगवेगळे भाग नदीत फेकून दिले.

मंगळवारी भरदिवसा ही घटना घडली आहे. हा संपूर्ण प्रकार होत असताना आजूबाजूच्या लोकांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न देखील केला नाही. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी हैदरला अटक केली असून, संपूर्ण प्रकरणाची माहिती घेत आहेत. हैदरच्या सांगण्यावरुन एटीएम मशीनचे वेगवेगळे पार्ट, डिस्प्ले बोर्ड, एटीएम कार्ड रीडर आणि हार्ड डिस्क नदीतून बाहेर काढण्यात आले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, हैदरचे मानसिक आरोग्य ठीक नव्हते. त्यामुळेच त्याने हे कृत्य केले आहे. याआधीही त्याने एकदा एटीएम मशीन फोडून त्यातून पैसे काढण्याचा प्रयत्न केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

HBD Ranveer Singh : बॉलिवूडचा बाजीराव किती कोटींचा मालक?

Ashadhi Ekadashi Marathi Wishes: पाऊले चालती पंढरीची वाट...आषाढी एकादशी निमित्ताने प्रियजनांना पाठवा 'हे' खास शुभेच्छा

Maharashtra Live News Update: सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी आज येलो अलर्ट जारी

Prataprao Jadhav : मुंबई गुजरातची राजधानी होती, शिंदे सेनेच्या प्रतापराव जाधवांचे वक्तव्य

Politics: 'छत्रपती संभाजी राजेंनी १६ भाषा शिकल्या, ते काय मु**'; शिंदे गटातील आमदाराची जीभ घसरली

SCROLL FOR NEXT