Saam Tv
क्राईम

Shocking News : पाठलाग करत कार अडवली, खेचत बाहेर ओढलं; नंतर शिवीगाळ करत बेदम मारलं; उद्योजकावर जीवघेणा हल्ला

Jalna Crime News : जालन्यात तरुण उद्योजकाला टोळक्याने बेदम मारहाण केली. या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

Alisha Khedekar

जालना शहरात रुण उद्योजकावर टोळक्याचा हल्ला

सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल

पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला

आरोपींवर कठोर कारवाईची मागणी

अक्षय पाटील, जालना

जालन्यातून धक्कदायक बातमी समोर आली आहे. शहरात तरुण उद्योजकाला टोळक्यानी बेदम मारहाण केली आहे. या मारहाणीच्या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. पीडित तरुण उद्योजकाचे नाव यश मित्तल असे आहे. याप्रकरणी शहरात खळबळ उडाली आहे.

मिळलेल्या माहितीनुसार, सदर घटना जालना शहरातील छत्रपती संभाजीनगर भागामध्ये रात्री साडेदहाच्या सुमारास घडली आहे. संभाजीनगर भागातून जात जात असताना यश मित्तल याच्या चार चाकी वाहनाचा पाठलाग करत तीन ते चार जण बाईक वरून आले. त्यानंतर त्यांनी मित्तलला शिवीगाळ केली.

मित्तल गाडीतून उतरताच हा वाद टोकाला गेला. संतापलेल्या दुचाकीस्वाराने मित्तल याला बेदम मारहाण केली. या झटापटीत मित्तल जखमी झाला. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. याप्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात तीन ते चार आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दाखल केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी या घटनेचा तातडीने तपास सुरु केला आहे. दरम्यान हे तरुण कोण होते ? यांनी या उद्योजकाला का मारहाण केली? हे अद्यापही अस्पष्ट आहे.अशा पद्धतीची दहशत माजवणाऱ्या गावगुंडांवर त्वरित कारवाई करण्याची मागणी सर्वसामान्य करत आहेत. या घटनेने उद्योजकवर्गातून संताप व्यक्त होत आहे. पोलीस या घटनेचा तपास करत आहेत. या हल्लखोराना काय शिक्षा होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heart Blockage Symptoms: छातीत सतत जळजळ होतेय? अ‍ॅसिडीटी नाही, तर रक्तवाहिन्या ब्लॉकेजचा धोका, वाचा लक्षणे आणि उपाय

Maharashtra Live News Update: नांदेड जिल्ह्यात तुफान पाऊस

BB19: 'वीकेंड का वार' मध्ये एक नाही तर दोन स्पर्धक पडणार बाहेर; या सदस्यांना करावा लागणार एविक्शनचा सामना

Satara Doctor Death : फलटण डॉक्टर आत्महत्या प्रकरणात भाजपच्या माजी खासदारांचं नाव|VIDEO

Paneer Butter Masala Recipe: ढाबा स्टाईल पनीर बटर मसाला घरी कसा बनवायचा? रेसिपी आहे अत्यंत सोपी

SCROLL FOR NEXT