Jalgaon Crime News Saam Tv
क्राईम

Shocking : फार्मसीच्या १९ वर्षीय विद्यार्थ्याची आत्महत्या, धक्कादायक कारण उघड

Jalgaon Crime News : जळगावातील फार्मसीच्या १९ वर्षीय विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये प्राचार्यवर छळाचे आरोप करण्यात आले असून पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Alisha Khedekar

  • जळगावातील फार्मसी विद्यार्थ्याची आत्महत्या

  • सुसाईड नोटमध्ये प्राचार्यावर छळाचे आरोप

  • रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

  • सीसीटीव्ही व साक्षीदारांच्या जबाबांचा तपास सुरू

संजय महाजन, जळगाव

जळगावमधून शिक्षण क्षेत्रात खळबळ उडवणारी घटना समोर आली आहे. जिल्ह्यातील एका नामांकित कॉलेजच्या फार्मसीच्या द्वितीय वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. विद्यार्थ्याने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये कॉलेजच्या प्राचार्यावर आरोप करण्यात आले आहे. त्यामुळे संबंधित प्राचार्याच्या छळाला कंटाळून विद्यार्थ्याने आत्महत्या केली असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात प्राचार्य योगेश पवार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पोलीस पुढील सखोल तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, श्याम प्रभाकर पाटील असे आत्महत्या करणाऱ्या १९ वर्षीय विद्यार्थ्यांचे नाव आहे. श्याम पाटील हा जळगावातील गुलाबराव देवकर कॉलेज ऑफ फार्मसीच्या द्वितीय वर्षात शिकत होता. या कॉलेजमधील प्राचार्य योगेश पवार यांनी काही दिवसांपूर्वी मित्रांच्या भांडणात मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या श्यामला पीव्हीसी पाईपने सर्व शिक्षक आणि विद्यार्थ्यांसमोर बेदम मारहाण केली.

महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी सर्वांसमोर केलेल्या मारहाणीमुळे अपमानित वाटल्याने श्यामने टोकाचे पाऊल उचलत गळफास घेत आत्महत्या केली. याबद्दल विद्यार्थ्याने आत्महत्येपूर्वी सुसाईड नोटमध्ये नमूद केले होते. तसेच "माझी स्टोरी इन्स्टावर टाक जो," अशी शेवटची विनंती देखील त्याने आपल्या मित्राला केल्याचे सुसाईड नोट मध्ये लिहिले होते. श्यामच्या खिशात सापडलेल्या 'सुसाईड नोट' वरून रामानंदनगर पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी प्राचार्य योगेश पवार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सध्या या प्रकरणाचा अधिक तपास करत असून सीसीटीव्ही फुटेज आणि इतर विद्यार्थ्यांचे जबाब नोंदवण्याचे काम सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. प्राचार्यांनी केलेल्या मारहाणीमुळे तणावत असल्याने तरुणाने आत्महत्या केल्याची प्रतिक्रिया देखील पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे. दरम्यान आता या प्रकरणी प्राचार्याला काय शिक्षा मिळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: बनेश्वर क्षेत्रातील मधमाशांचा वाढता धुमाकूळ, भाविकांच्या जीवितास धोका

ठाणे रेल्वे स्टेशनवरील प्रवाशांची गर्दी कमी होणार; मोदी सरकारने घेतला गेमचेंजर निर्णय

कृषिप्रधान देशाचा कणा अक्षरशः रडला! कांद्याला भाव किलोला फक्त ५० पैसे, ७३ पोती विकली, हातात आले ४०० रुपये

Kidney health: तुमच्या दररोजच्या या ६ सवयी किडनीला करतायत निकामी!

निदा खानला आश्रय देणं भोवलं; एमआयएमच्या नेत्याच्या घर आणि ऑफिसवर चालणार बुलडोझर|VIDEO

SCROLL FOR NEXT