Crime news  Saam Tv file pic
क्राईम

Jalna Crime News: भयानक! प्रेमी युगुलानं संपवलं जीवन; कारण अजून समजेना

Extramarital love Affair: जालना जिल्ह्यातील एका प्रेमी युगुलाने आत्महत्या केल्याची घटना घडलीय. या युगुलाने टोकाचं पाऊल का उचललं याचं कारण अद्याप समजलेलं नाहीये.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रामू ढाकणे, साम प्रतिनिधी

जालना : एक युवक आणि युवती छत्रपती संभाजीनगरवरुन दुचाकीने एका गावाच्या पाटीजवळ आले. त्या गावाच्या पाटीजवळ आपली बाईक उभी केली. त्यानंतर ते दोघे शेजारच्या शेतात असलेल्या लिंबाच्या झाडाखाली गेले. त्यानंतर कोणाला काही थांगपत्ता लागण्याआधी त्यांनी आपलं जीवन संपवलं. ही भयानक घटना घडलीय जालना जिल्ह्यात.

जालनामधील शिंगाडे पोखरी शिवारात एका विवाहित प्रेमी युगुलाने लिंबाच्या झाडाला गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडलीय. या घटनेची माहिती मिळताच मौजपुरी पोलीस ठाण्याचे काही पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.आणि पंचनामा करून दोघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी जालन्यातील घाटी रुग्णालयामध्ये पाठवले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कैलास गवई आणि मुक्ता खंडागळे अशी मयातांची नावे आहेत. प्रेमी युगुल छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील रांजणगाव येथील रहिवासी होते. दरम्यान त्यांनी हे टोकाचे पाऊल का उचललं याचं कारण अजून समजू शकलेले नाही. मात्र प्रेम प्रकरणातूनच ही आत्महत्या झाली असल्याचा संशय आता पोलिसांनी व्यक्त केलाय.

दरम्यान या घटनेसंदर्भाततील अधिकची माहिती अशी की, हे दोघेही छत्रपती संभाजीनगरवरुन आपल्या दुचाकीवर आले होते, त्यानंतर जालना तालुक्यातील शिंगाडे पोखरी पाटीजवळ आपली दुचाकी लावली. शेजारच्या शेतात असलेल्या लिंबाच्या झाडाला गळफास घेत या दोघांनीही आपली जीवन यात्रा संपवली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhule Crime: लग्नसोहळ्यात चाकूने वार करत तिघांची निर्घृण हत्या, गुजरात बॉर्डरवरून ३ जणांना अटक; नेमकं काय घडलं?

सोशल मीडियावरील गुंतवणुकीच्या आमिषात अडकला मलेशियन दूतावासातील कर्मचारी; गमावले 78.85 लाख

Ahilyanagar Crime: १५ वर्षीय मुलीचं अपहरण करत बलात्कार, ५ दिवस जंगलात डांबून ठेवले अन्...; अहिल्यानगर हादरले

Traffic Rules: चप्पल घालून कार चालवल्याने चलान लागतं? काय आहे नियम?

मोठी बातमी! भाजपा फुटली; राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT