Bhandara Crime News Update  
क्राईम

Crime : चारित्र्यावर संशय, महिलादिनी नवऱ्याने बायकोवर चाकूने केले सपासप वार, भंडारा हादरले

Bhandara Crime News Update : भंडाऱ्यात चारित्र्यावर संशय घेत नवऱ्याने बायकोवर चाकून सपासप वार केले. महिला दिनीच भंडाऱ्यात घडलेल्या या धक्कादायक घटनेमुळे एकच खळबळ उडाली.

Namdeo Kumbhar

शुभम देशमुख, साम टीव्ही

Bhandara Crime News Update : भंडाऱ्यात नवऱ्याने बायकोवर चाकूने सपासप वार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. महिलादिनीच नवऱ्याने बायकोवर हल्ला केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. चारित्र्यावर संशय घेत नवऱ्याने बायकोवर प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली असून रूग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून तपास सुरू कऱण्यात आला आहे.

भंडाऱ्याचा तुमसर शहरातील रामकृष्ण नगरात पतीने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत गळ्यावर धारदार चाकूने वार केला. जागतिक महिला दिनीच नवऱ्याने बायोकवर हल्ला केल्यामुळे एकच खळबळ उडाली. कुंदा भुपेंद्र पाहुणे (२५), रा. रामकृष्ण नगर, तुमसर असे प्राणघातक हल्ल्यात जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. तर भुपेंद्र पाहुणे (३५) रा. रामकृष्ण नगर, तुमसर, असे आरोपी पतीचे नाव आहे.

जागतिक महिलादिनी पतीने पत्नीच्या गळ्यावर धारदार चाकूने वार करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली. घटनेच्या दिवशी आरोपी पती भुपेंद्र पाहुणे याने पत्नी कुंदा पाहुणे ही घरी झोपली असताना तिच्या चारित्र्यावर संशय घेतला. त्यानंतर दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. पती पत्नीचा वाद विकोपाला गेला. आरोपी पतीने रागाच्या भरात हातात चाकू घेऊन पत्नी कुंदाच्या गळ्यावर दोन्ही बाजूने वार केला. या हल्ल्यात ती रक्तबंबाळ होऊन रक्ताच्या थारोळ्यात पडली. त्यात ती गंभीर जखमी झाली. दरम्यान तिला उपचारार्थ येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमीवर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. सदर घटनेची नोंद तुमसर पोलिसात करण्यात आली असून आरोपी पती विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर घटनेचा पुढील तपास पोलिस करीत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Good News: शेतकऱ्यांच्या फायद्याची बातमी! शेत-रस्त्यांच्या आदेशाची ७ दिवसांत होणार अंमलबजावणी; सरकारचा मोठा निर्णय

AI Eduaction: केंद्राचा मोठा निर्णय! आता तिसरीपासूनच AI शिकवलं जाणार; १ कोटी शिक्षकांना देणार प्रशिक्षण

Fish Price Hike : खवय्यांच्या ताटातून मासे गायब होणार, सुरमई -पापलेटसह इतर मासळीचे दर गगनाला | VIDEO

Amitabh Bachchan : सलमान खानच्या 'बॅटल ऑफ गलवान'मध्ये अमिताभ बच्चन यांची एन्ट्री? 'त्या' फोटोनं चर्चेला उधाण

'शुटिंग करायचं सांगून खोलीत नेलं अन्..' १७ मुलांना ओलीस ठेवणाऱ्या रोहितनं नेमकं काय केलं? कोल्हापूरच्या आजीबाईंनी सांगितला थरार

SCROLL FOR NEXT