Husband Locked Wife Saam Tv
क्राईम

Shocking News : बायकोला १२ वर्षे घरातच कोंडून ठेवलं; नवऱ्यानं गाठला क्रूरतेचा कळस

Husband Locked Wife In House: म्हैसूरमधून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पतीने पत्नीला 12 वर्षे घरात कोंडून ठेवल्याची घटना घडली आहे. आपण याबाबात सविस्तर जाणून घेऊ या.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Karnataka Mysore Crime News

पती-पत्नीतल्या वादातून बऱ्याच वेळा गंभीर स्वरूपाचे गुन्हे घडतात. कर्नाटक राज्यातील म्हैसूरमध्ये (Karnataka Mysore) अशाच प्रकारची एक घटना घडली. या घटनेत एका व्यक्तीने त्याच्या पत्नीला 12 वर्षांपासून घरात कोंडून ठेवलं होतं. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी या महिलेची सुटका केलीय. पोलिसांनी या प्रकरणी महिलेची चौकशी केली. तेव्हा धक्कादायक माहिती समोर (Crime News) आहे. (Latest Crime News)

म्हैसूरमध्ये एका महिलेला तिच्या पतीने लग्न झाल्यापासून 12 वर्ष घरात कोंडून ठेवलं (Husband Locked Wife In House) होतं. पोलिसांनी पीडित महिलेची सुटका केलीय. या महिलेनं तिच्या पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यास नकार दिलाय. तिनं माहेरी तिच्या पालकांच्या घरी राहण्याचा निर्णय घेतलाय.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पीडित महिला आरोपीची तिसरी पत्नी असल्याची माहिती मिळतेय. सुटका केल्यानंतर या पीडित महिलेचं समुपदेशन देखील करण्यात आलं. तेव्हा, तिने तिला तिच्या पतीविरुद्ध तक्रार करायची नाही. ती माहेरी राहून तिच्या वैवाहिक जीवनाचे प्रश्न सोडवणार आहे, असं (Husband Locked Wife) सांगितलं.

या महिलेचं वय तीस आहे. तिने सांगितलं की, मला माझ्या पतीने 12 वर्षांपासून घरात कोंडून ठेवलं होतं. तेव्हा ती घरातल्या कोपऱ्यात असलेल्या एका लहान बॉक्सचा वापर टॉयलेटसाठी करत (husband locked wife for 12 years) होती. त्यांना दोन मुलं आहेत. मुलं शाळेतून परत आले की, घराबाहेर थांबायचे. तिचा नवरा कामावरून परत आल्यानंतर मुलांना घरात घेतलं जात होतं.

पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार ही महिला गेल्या दोन ते तीन आठवड्यांपासून तिच्या घरात बंदिस्त होती. तिच्या हालचालींवर देखील बंधनं होती. पीडित महिला यापूर्वी तिच्या माहेरी गेली (Mysore Crime News) होती. तिच्या पतीला असुरक्षित वाटत असल्यामुळं तो कामावर जाण्यापूर्वी तिला घरात कोंडूत घेत असे. हा सगळा भयानक प्रकार ऐकून पायाखालची जमिनच सरकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Actress Father shot: 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीच्या वडिलांवर झाडल्या गोळ्या; २ तरुणांनी केला हत्येचा प्रयत्न

Devendra Fadnavis : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचा आशीर्वाद मलाच मिळाला; देवेंद्र फडणवीस असं का म्हणाले?

Amarnath Yatra Bus Accident : अमरनाथ यात्रेला जाणाऱ्या भाविकांच्या वाहनांचा भीषण अपघात; 5 बस एकमेकांना आदळल्या, परिसरात खळबळ

Ashadhi Ekadashi: आषाढी एकादशीच्या उपवासात चुकूनही खाऊ नका हे ५ पदार्थ

Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचा वापर केला; ते युज अँड थ्रो करणारे, मेळाव्यानंतर भाजप नेत्याची जळजळीत टीका

SCROLL FOR NEXT