HARYANA TRIPLE MURDER: YOUTH SHOOTS DEAD GRANDMOTHER, BROTHER AND UNCLE Saam tv
क्राईम

तरुणाने आपल्याच घरच्यांवर झाडल्या गोळ्या, आजी, काका अन् भावाचा घेतला जीव; तिहेरी हत्याकांडानं खळबळ उडाली

Youth Firing On Family Member: हरियाणातील अंबाला येथे जमीन आणि आर्थिक वादातून हिंसक वळण लागले. एका तरुणावर त्याच्या आजी, मोठा भाऊ आणि काका यांची गोळ्या झाडून हत्या केल्याचा आरोप आहे, तर त्याची आत्या गंभीर जखमी झाली आहे.

Bharat Jadhav

  • हरियाणातील अंबाल्यात तिहेरी हत्याकांडाने खळबळ उडाली.

  • जमीन आणि आर्थिक वादातून कुटुंबीयांवर गोळीबार झाल्याचा आरोप.

  • आजी, मोठा भाऊ आणि काकाचा मृत्यू; आत्या गंभीर जखमी.

हरियाणातील अंबाला येथे एका तरुणाने आपल्याच कुटुंबातील सदस्यांवर गोळ्या झाडत तिघांची हत्या केली आहे. या तिहेरी हत्याकांडामुळे संपूर्ण परिसर हादरला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जमिनीवरून कौटुंबिक वाद सुरू होता, पण त्याचे रूपांतर हत्याकांडात होईल याची कोणी कल्पनाही केली नव्हती.

या प्रकरणात एका तरुणाने रागाच्या भरात आपल्याच कुटुंबातील सदस्यांवर गोळीबार केल्याचा आरोप आहे. या घटनेत हल्लेखोराची ९५ वर्षीय आजी, मोठा भाऊ आणि काका यांचा मृत्यू झाला. त्याची आत्या गंभीर जखमी असून तिच्यावर पीजीआयमध्ये उपचार सुरू आहेत. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

जमिनीचा वाद जिवावर उठला

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, जमीन, माती उत्खननाचे कंत्राट आणि पैशांवरून कुटुंबात बऱ्याच काळापासून वाद सुरू होता. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी अभिषेक आणि त्याच्या कुटुंबात यापूर्वीही अनेकदा वाद आणि भांडणे झाली होती. वडिलांच्या निवृत्तीनंतर मिळालेल्या पैशांवरूनही कुटुंबात मतभेद निर्माण झाली होती. अभिषेक त्याचा मोठा भाऊ संदीप याच्यावरही नाराज होता. हाती आलेल्या माहितीनुसार आरोपी पंचकुला येथे फार्मसीचे शिक्षण घेत होता.

किरकोळ भांडणातून घडलं हत्याकांड

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी संध्याकाळी घरात काही कुटुंबीय उपस्थित असताना त्यांच्यात वाद सुरू झाला. हा वाद इतका वाढला की अभिषेकने आपले पिस्तूल काढून अंदाधुंद गोळीबार केला. त्याने सर्वात आधी आपल्या ९५ वर्षीय आजी, इस्रो देवी यांच्यावर गोळी झाडली. जेव्हा इतर कुटुंबीयांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्याने त्यांच्यावरही गोळीबार केला.

काका आणि भावाने केला होता वाचण्याचा प्रयत्न

गोळीबारादरम्यान अभिषेकचे काका महेंद्र आणि मोठा भाऊ संदीप यांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र आरोपीचा राग इतका तीव्र होता की त्याने त्यांनाही लक्ष्य केले. गोळ्या लागून दोघेही गंभीर जखमी झाले. त्याची आत्याही जखमी झाली. तिघांनाही तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी संदीप आणि महेंद्र यांची स्थिती पाहता त्यांना पीजीआय रुग्णालयात नेण्यास सांगितलं. परंतु वाटेतच त्याची स्थिती अधिकच गंभीर झाल्याने त्या दोघांचा मृत्यू झाला. तर आजीवर रुग्णालयात उपचार चालू होते, मात्र त्यांचाही मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sri Lanka cricket: श्रीलंकेत क्रिकेट कोचच्या हत्येने खळबळ; खेळाडूंसोबत भांडणानंतर नेमकं काय घडलं? क्रिकेटपटू अटकेत

Clothes Tips : दुसऱ्यांचे कपडे का घालू नयेत? कारण वाचाल तर धक्काच बसेल, ताबडतोब सोडाल सवय

Chilli Paneer Recipe: टेस्टी आणि स्पायसी चायनिज चिली पनीर बनवा घरच्या घरी; वाचा सोपी रेसिपी

Maha ID : आता कागदपत्रांची झंझट संपणार? महाराष्ट्रात ‘महा-आयडी’ची तयारी; एका डिजिटल ओळखीतून सरकारी सेवांचा लाभ

Maharashtra News Live Update: खासदार हरसिमरत कौर यांनी गुरुद्वारात केला अखंडपाठ

SCROLL FOR NEXT