Delhi Crime News  Saam tv
क्राईम

Crime News: पत्नीच्या कटकटीचा वैताग; व्हिडिओत कैफियत मांडत माजी पोलीस अधिकाऱ्यानं स्वत:वर झाडली गोळी

Former Police Shoot Himself: दिल्ली पोलिसांच्या निवृत्त उपनिरीक्षकाने आत्महत्या केली आहे. माजी उपनिरीक्षकाने परवाना असलेल्या रिव्हॉल्व्हरने स्वतःवर गोळी झाडली. हरियाणातील बहादूरगडमध्ये ही घटना घडलीय.

Bharat Jadhav

एका निवृत्त पोलीस उपनिरीक्षकाने स्वत: वर गोळी झाडत आत्महत्या केलीय. आत्महत्या करण्यापूर्वी अधिकाऱ्याने व्हिडिओ बनवला, त्यात त्यांनी आत्महत्येचं कारण सांगितलं. त्यानंतर परवानाधारक रिव्हॉल्व्हरने गोळी झाडत आयुष्य संपवलं. बायको आणि कुटुंबातील इतर व्यक्तीच्या त्रासाला कंटाळून स्वत: वर गोळी झाडली. ही घटना हरियाणातील बहादूरगड येथे घडलीय. नरेंद्र छिकारा, असे अधिकाऱ्याचे नाव आहे.

दिल्ली पोलिसात होते कार्यरत

नरेंद्र छिकारा हे दिल्ली पोलीस दलात उपनिरीक्षक म्हणून कार्यरत होते. त्यांनी काही दिवसांपूर्वी व्हीआरएस घेतली होती. ते बहादूरगडमधील सेक्टर ६ मध्ये असलेल्या घर क्रमांक ११५५ येथे राहत होते. छिकारा हे मूळ बामडोली गावचे रहिवासी होते. मिळालेल्या माहितीनुसार, छिकारा यांनी स्वत:वर गोळी झाडली तेव्हा ते घरात एकटेच होते. दरम्यान घटनेची माहिती पोलिसांनी मिळाली तेव्हा त्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा केला. त्यानंतर फॉरेन्सिक टीमला पाचारण करत तेथील काही पुरावे गोळा केले.

आत्महत्येपूर्वी व्हिडिओ बनवला

स्वत: वर गोळी झाडण्यापूर्वी नरेंद्र छिकारा यांनी त्यांच्या मोबाईलवर व्हिडिओ बनवला. या व्हिडिओमध्ये त्यांनी आपल्या मृत्यूसाठी पत्नी, मुलगा, मुलगी, सासरा आणि मेव्हण्याला जबाबदार धरले आहे. आपल्या मोठ्या मुलीच्या आंतरजातीय विवाहामुळे नरेंद्र छिकारा तणावात होते. पत्नीने त्यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता, त्यामुळेही ते चिंतेत होते. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, आत्महत्या केलेल्या पोलीस अधिकाऱ्याला एक मुलगा आणि २ मुली आहेत. त्यांच्या मोठ्या मुलीचा आंतरजातीय विवाह झाल्यापासून त्यांचे कुटुंब नरेंद्र छिकारा यांच्यासोबत राहत नव्हते.

काही दिवसापूर्वीही एका सीआयएसएफमध्ये कार्यरत असलेल्या एका महिला हेड कॉन्स्टेबलने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली होती. आठवड्याभरापूर्वी, CISF च्या एका महिला हेड कॉन्स्टेबलने देखील दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरील (IGI विमानतळ) शौचालयात जात स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना घडली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

चिमुकल्यांच्या पोषण आहाराचा पर्दाफाश; सेविकेवर कारवाई, आता प्रशासनाने घेतला मोठा निर्णय!

पाण्याचा प्रश्न सुटणार? 140 एकरांसाठी ब्रिजस्टोन इंडियाची मोठी घोषणा! नेमका काय आहे प्रोजेक्ट?

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची भाजपविरोधात आक्रमक भूमिका

Sambhajinagar: आत्महत्या करणाऱ्या तरुणाला वाचवायला गेले, डोंगरावरून पडून आई-वडील अन् मुलाचा मृत्यू; संभाजीनगर हादरले

Chandra Grahan 2026: रक्षाबंधनाला चंद्रग्रहणाचे सावट! भारतात सुतक लागणार की नाही?

SCROLL FOR NEXT