Gujarat News 5 People Death after taking cough medicine Two people are critical condition in Kheda district  Saam TV
क्राईम

Shocking News: खळबळजनक! खोकल्याचे औषध घेतल्याने ५ जणांनी गमावला जीव; दोघांची प्रकृती गंभीर

Gujarat Crime News: खोकल्याचे विषारी औषध प्यायल्याने ५ जणांचा मृत्यू झाला आहे. ही खळबळजनक घटना गुजरातच्या खेडा जिल्ह्यामध्ये घडली आहे.

Satish Daud

Gujarat Crime News

वातावरणात सातत्याने बदल होत असल्याने अनेकांना सर्दी, खोकला, तसेच तापाची लक्षणे दिसून येत आहेत. त्यातच डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढत असल्याने अशी लक्षणे दिसल्यास त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असं आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आलंय. अशातच खोकल्याचे विषारी औषध प्यायल्याने ५ जणांचा मृत्यू झाला आहे. ही खळबळजनक घटना गुजरातच्या खेडा जिल्ह्यामध्ये घडली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी कफ सिरपची विक्री करणाऱ्या दुकानदारासह तीन जणांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. मिथाईल अल्कोहोलचा अंश असलेले आयुर्वेदिक कफ सिरफ घेतल्यानंतर या लोकांचा मृत्यू झाला असावा, असा पोलिसांना संशय आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत व्यक्ती खेडा जिल्ह्यातील नडियाद येथील बिलोदरा गावातील रहिवासी आहेत. खोकल्याचा त्रास जाणवत असल्याने दोन दिवसांपूर्वी त्यांनी एका दुकानातून खोकल्याचे सिरप घेतले होते. औषधाचे सेवन करताच त्यांची प्रकृती बिघडली.

त्यामुळे या रुग्णांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथे उपचार सुरू असताना दोन दिवसांत ५ जणांचा मृत्यू झाला. अजूनही दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगितलं जातंय. या कफ सिरपमध्ये मिथाईल अल्कोहोल असल्याचे या नमुन्याच्या तपासणीत आढळून आले.

या घटनेनंतर पोलिसांनी औषध विक्रेत्याला चौकशीसाठी ताब्यात घेतलं. आपल्याकडून ५० हून अधिक लोकांनी औषधाची खरेदी केल्याचं त्याने पोलिसांना सांगितलं. खोकल्याच्या औषधाच्या नावाखाली काही लोक नशा करण्यासाठी कफ सिरपचा वापर करतात. त्याच्या अतिसेवनाने देखील मृत्युचा धोका संभावतो, असं डॉक्टरांनी सांगितलं आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Famous Actress Death: सिनेसृष्टीचा तेजस्वी तारा हरपला, ज्येष्ठ अभिनेत्री काळाच्या पडद्याआड; मनोरंजन विश्वावर शोककळा

Health Tips : दातांमध्ये गॅपमुळे मनमोकळे हसता येईना! हसताना लाज वाटतेय? या उपाय खुलवतील तुमचं हास्य

चिमुकल्यांच्या पोषण आहाराचा पर्दाफाश; सेविकेवर कारवाई, आता प्रशासनाने घेतला मोठा निर्णय!

पाण्याचा प्रश्न सुटणार? 140 एकरांसाठी ब्रिजस्टोन इंडियाची मोठी घोषणा! नेमका काय आहे प्रोजेक्ट?

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची भाजपविरोधात आक्रमक भूमिका

SCROLL FOR NEXT