Gondia News  Saam Digital
क्राईम

Gondia News : रेती व्यावसायिक गोलू तिवारी हत्याप्रकरणी 7 जणांना ठोकल्या बेड्या; त्या रात्री घडली होती भयानक घटना

Gondia Crime News : गोंदियातील येथील गोलू उर्फ रोहीत हरिप्रसाद तिवारी (३६) यांची सोमवारी रात्री गोळी घालून हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत अवघ्या 24 तासाच्या आत 7 संशयित आरोपींना ताब्यात घेतलं आहे.

Sandeep Gawade

शुभम देशमुख

गोंदियातील येथील गोलू उर्फ रोहीत हरिप्रसाद तिवारी (३६) यांची सोमवारी रात्री गोळी घालून हत्या करण्यात आली होती. उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत अवघ्या 24 तासाच्या आत 7 संशयित आरोपींना ताब्यात घेतलं आहे. 29 एप्रिलपर्यंत या सातही आरोपींना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आर्थिक देवाण-घेवाण आणि पूर्व वैमनश्यातून ही हत्या झाल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी रोहिणी बानकर यांनी दिली.

गोलू तिवारी हे सोमवारी रात्री दुचाकीने तिरोड़ा येथून गोंदियाकडे येत होते. यादरम्यान त्यांच्या एका दुचाकीवर दोन जणांनी त्यांचा पाठलाग करुन गोळीबार केला. दरम्यान गोलू तिवारी यांनी जीव वाचवण्यासाठी आपल्या दुचाकीचा वेग वाढविला. कुडवा चौकापासून काही अंतरावर असलेल्या एका बारसमोर त्यांची दुचाकी स्लिप झाली. आधीच त्यांना गोळी लागली असल्याने आणि दुचाकी स्लिप झाल्याने ते गंभीर जखमी झाले.

या घटनेची माहिती रामनगर पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेला गोलू तिवारीला उपचारासाठी रिंग रोड परिसरातील सहयोग हॉस्पिटल येथे दाखल केले. त्याच्यावर उपचार सुरू करण्यापुर्वीच त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत अवघ्या 24 तासाच्या आत 7 आरोपींना ताब्यात घेतला आहे. 29 एप्रिल पर्यंत या सातही आरोपींना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आर्थिक देवाण-घेवाण आणि जुन्या वैमानुष्यातून ही हत्या झाल्याची माहीती पोलिसांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Zumba: वजन कमी करण्यासाठी झुंबा खरचं फायदेशीर आहे का?

SSC Exam : बोर्डाच्या कॉपीमुक्त परीक्षा मिशनचा फज्जा, दहावीचा पेपर ३ दिवस आधीच फोडला

LPG Crisis: जनता 'गॅस'वर, हॉटेल चुलीवर, हॉटेलला आता लाकडं, कोळशाचा आधार

Thursday Horoscope : मानसिक तणाव जाणवेल; ५ राशींच्या लोकांना वाणीवर संयम ठेवावा लागेल, अन्यथा...

Maharashtra Live News Update : पुढील दोन दिवस उन्हाचा कडका, तापमान 40 पार जाण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT