gondia gramin police arrests two in fake accident case saam tv
क्राईम

Crime News: 'खून का बदला खून' म्हणत काढला काटा... 'कानून के हाथ लंबे हाेते है' पाेलीसांनी दाखवून दिले; वाचा रहस्यमयरित्या खूनाचा उलगडा

हा अपघात खोब्रागडे यांच्या कुटुंबीयांना संशयास्पद वाटला.

Siddharth Latkar

- शुभम देशमुख

Gondia News :

'खून का बदला खून' असा डायलाॅग आपण नेहमी सिनेमात ऐकतो. हा डायलाॅग डाेक्यात ठेवत ३० वर्षांपूर्वी वडिलांच्या झालेल्या खूनाचा वचपा काढण्यासाठी केलेले नियाेजन याेगरित्या राबवित संशयितांच्या माध्यमातून बदला घेण्यात आला. परंतु कानुन के हात लंबे हाेते है याची प्रचिती संशयितांना गाेंदिया पाेलीसांनी दाखवून दिली. खून करुन अपघाताचा बनवा रचणा-या दाेघांना गाेंदिया ग्रामीण पाेलीसांनी (gondia police) अटक केली. (Maharashtra News)

पाेलीसांकडून मिळालेल्या माहितीनूसार गोंदिया ग्रामीण पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या २९ नोव्हेंबर २०२३ ला सायंकाळी ६ ते ६:३० वाजता दरम्यान फुलचुरटोला ते पिंडकेपार जाणाऱ्या मार्गावर मोटारसायकलचा अपघात झाला हाेता. या घटनेत मोरेश्वर खोब्रागडे (moreshwar khobragade) यांचा मृत्यू झाला.

हा अपघात खोब्रागडे यांच्या कुटुंबीयांना संशयास्पद वाटला. त्यांनी याबाबत पोलिसांकडे तक्रार केली होती. यावरून गोंदिया ग्रामीण पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. तपासाअंती दाेघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून धक्कादायक माहिती उघडकीस आली.

पाेलीसांनी या प्रकरणात सुनील भोंगाडे (sunil bhongade) व शाहरुख शेख (sharukh shaikh) या दाेघांवर (कलम ३०२, ३४१, ३४ अन्वये) गुन्हा दाखल केला. त्यांना अटक करण्यात आली असल्याची माहिती प्रमोद मडामे (उपविभागीय पोलीस अधिकारी) यांनी दिली.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या खून प्रकरणाचा छडा लावून सत्यता पडताळून गुन्ह्याचा उलगडा पोलिसांनी केला त्यात हा अपघात नसुन खून असल्याचे स्पष्ट झाले आहे असेही मडामे यांनी साम टीव्हीशी बाेलताना नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: विठ्ठल रुक्मिणी मंदिर फुलांनी सजले

Raj Thackeray: 'मुंबईत येऊन राज ठाकरेंचा माज उतरवणार'; बिहारचे खासदार पप्पू यादवांची मुजोरी

Marathi Bhasha Vijay Melava: ठाकरे बंधू काय बोलणार हे ऐकण्यासाठी आलोय, विजयी मेळाव्याला मराठी कलाकारांची उपस्थिती

Dayaben Look: बाबो! किती बदलली 'तारक मेहता...' मधली दयाबेन; नवा लूक पाहून चाहते थक्क!

Marathi bhasha Vijay Live Updates : ठाकरेंनी साद घातल्यावर अख्या महाराष्ट्राने प्रतिसाद दिलाय - अनिल परब

SCROLL FOR NEXT