crime news marathi  Saam tv
क्राईम

Crime : महिन्याभरापूर्वी लग्न, हनिमूनवरून वाद, सासऱ्याने जावयाच्या अंगावर ॲसिड फेकले

kalyan crime News : सासऱ्याने जावयाच्या अंगावर अॅसिड फेकल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेनंतर सासरा फरार झाला आहे. जावयावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Namdeo Kumbhar

kalyan Latest Crime News : कल्याणमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. संतापलेल्या सासऱ्याने जावयावर केला अॅसिड हल्ला केला. हनिमूनला जाण्यावरून दोघांमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होता. जावयाला काश्मिरला जायचे होते.. तर सासरा मक्का मदीना येथे जा, म्हणून सांगत होते. त्यावरून दोघांमध्ये जोरदार वाद झाला. संतापलेल्या सासऱ्याने जावयावर असिडने हल्ला केला.

हनिमूनला जाण्यावरून जावई आणि सासऱ्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होता . जावयाला हनिमूनसाठी काश्मीरला जायचं होतं तर सासर्‍याने काश्मीरला जाण्यास विरोध करत तू मक्का मदीनाला जा असे जावयाला सांगितलं होतं. याच कारणावरून दोघांमध्ये गेल्या अनेक दिवस वाद सुरू होता. काल रात्री आठ वाजण्याच्या सुमारास कल्याण लालचौकीजवळ सासऱ्याने जावयाला गाठले त्याने जावयावर अॅसिड हल्ला केला. या हल्ल्यात जावई ईबाद फालके गंभीर जखमी झाला. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर घटनेनंतर आरोपी सासरा जकी खोटाल पसार झालाय . याप्रकरणी बाजारपेठ पोलिसांनी गुन्हा दाखल करत सासऱ्याचा शोध सुरू केला .

कल्याण पश्चिम परिसरात ईबाद फालके आपल्या कुटुंबासोबत राहतो. महिनाभरापूर्वी याच परिसरात राहणाऱ्या जकी खोटाल याच्या मुलीशी इबादचे लग्न झाले होते. लग्न झाल्यानंतर इबादला हनिमूनसाठी काश्मीरला जायचं होतं. त्यासाठी त्यांनी तयारी देखील केली. मात्र सासरा जकी खोटाल याने तुम्ही काश्मीरला जाऊ नका, प्रार्थनेसाठी मक्का मदीनाला जा असे जावयाला सांगितले. यावरून जावयी ईबाद व सासरा जकी या दोघांमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद देखील सुरू होते.

जावई ऐकत नसल्याने जकी संतापला होता. काल सायंकाळी ईबाद लालचौकी परिसरातून घराच्या दिशेने पायी जात असताना जकी रिक्षाने आला त्याने ईबादला गाठले आणि ईबादवर अॅसिड हल्ला केला. या हल्ल्यात ईबाद गंभीर जखमी झाला. असून त्याच्यावर कल्याण मधील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी बाजारपेठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत या प्रकरणाचा तपास सुरू केलाय. फरार असलेला जकी खोटाल याचा शोध बाजारपेठ पोलीस घेत आहेत. या घटनेमुळे कल्याण शहरात एकच खळबळ उडाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yellow teeth: दात रोज घासूनही पिवळे दिसतात? फक्त ब्रश करणं पुरेसं नाही; 'ही' कारणं असू शकतात

Maharashtra News Live Update : पुणे पदवीधर मतदार संघासाठी हर्षदा देशमुख यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल

ST Pass Online: एसटीचा मोठा निर्णय! 'आवडेल तेथे प्रवास' पास आता २ मिनिटात, बसस्थानकावर जायची गरज नाही, A टू Z माहिती

Drishyam 3 Box Office Collection: विजय साळगावकरची चाहत्यांमध्ये क्रेझ, रविवारी 'दृश्यम ३'ने केली इतक्या कोटींची कमाई

IAS तुकाराम मुंढे झाले 'रॉकस्टार'! 'द न्यू यॉर्क टाइम्स'च्या पहिल्या पानावर झळकले; काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT