Dombivli, Vishnunagar Police Station Saam Tv
क्राईम

Dombivli News: शिवसेनेच्या माजी नगरसेवकांच्या नावाने व्यावसायिकांकडून उकळले पैसे, पोलिसात गुन्हा दाखल

Dombivli Crime News: डोंबिवलीतील माजी नगरसेवकांच्या नावाने व्यावसायिकांकडून पैसे उकळन्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे.

साम टिव्ही ब्युरो

>> अभिजित देशमुख

Dombivli Crime News:

डोंबिवलीतील माजी नगरसेवकांच्या नावाने व्यावसायिकांकडून पैसे उकळन्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी शिवसेनेचे माजी नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी विष्णूनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. या तक्रारीनुसार पोलिसांनी बेघाजी दबाले आणि संदीप शिंदे या दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु केला आहे.

फोनवर शेठ बोलतोय समोरच्या व्यक्तिला मदत करा, असे भासवून अनेक व्यावसायिकांकडून पैसे उकळन्यात येत होते. रमेश म्हात्रे यांच्यासह दिपेश म्हात्रे, वविकास म्हात्रे यांच्या नावाने देखील या दुकलीने पैसे उकळल्याची माहिती समोर आली आहे.  (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

डोंबिवलीत उघडकीस आलेल्या एका प्रकारामुळे शिवसेना भाजपच्या माजी नगरसेवकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. काही तरुण व्यावसायिक नागरीकांकडे जात होते. एका व्यक्तीला फोन लावून द्यायचे. समाेरच्या व्यक्तीला फोनवर शेठ बोलत आहे. त्यांनी तुम्हाला आमच्याकडे पैसे देण्यास सांगितले. असे सांगायचे.  (Latest Marathi News)

यांची मागणी केवळ पाचशे, हजार आणि दोन हजार रुपये असायची. प्रतिष्ठीत व्यक्ती फोन करतोय अस समजून लोकं मदतीच्या नावाखाली पैसे देत होते. असाच प्रकार शिवसेनेचे माजी नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्या सोबत घडला. म्हात्रे यांच्या नावाने पैसे उकळण्यात आल्याची माहिती त्यांना मिळाली होती. या प्रकरणी रमेश म्हात्रे यांनी तत्काळ विष्णूनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.

या तक्रारीनुसार विष्णूनगर पोलिसांनी बेघाडी दबाले आणि त्याचा साथीदार संदीप शिंदे या दोघा विरोधात गुन्हा दाखल केला. त्यांचा शोध सुरू आहे. रमेश म्हात्रेच नाही तर दीपेश म्हात्रे आणि विकास म्हात्रे यांचा नावाचाही वापर पैसे उकळण्यासाठी केला गेल्याची माहिती समोर आली आणखी किती जणांना या टोळीने गंडा घातलाय या प्रकरणाचा तपास सुरु आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: आपच्या 7 खासदारांना दिलासा, भाजप प्रवेशाला मंजुरी

Garam Pani Kund In Mandla History: बापरे चमत्कारच! बाराही महिने गरम पाणी वाहणारं हे कुंड नेमकं आहे तरी कुठे?

Pune : पुण्यातील नामंकित कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांची रॅगिंग; ५ जणांवर गुन्हा

मुंबईहून १६६ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या विमानात तांत्रिक बिघाड; भोपाळमध्ये केलं एमर्जन्सी लँडिग

लग्नाचं वचन देऊन Bigg Boss फेम अभिनेत्रीने 9 कोटींना लुटले; NRI तरुणाचा गंभीर आरोप, नेमकं प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT