Pimpari Chinchwad Crime Saam Tv
क्राईम

Crime: पिंपरीमध्ये रक्तरंजित थरार, अनैतिक संबंधातून दोघांची निर्घृण हत्या, आधी डोक्यात दगड घातला अन्...

Pimpari Chinchwad Crime: पिंपरी-चिंचवडमध्ये भयंकर घटना घडली. एका महिला आणि पुरूषाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली. अनैतिक संबंधातून दोघांची हत्या केल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

Priya More

गोपाळ मोटघरे, पिंपरी-चिंचवड

पिंपरी-चिंचवडमध्ये दोन जणांची निर्घण हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. डोक्यामध्ये दगड घालून एका महिला आणि पुरूषाची निर्घृण हत्या करण्यात आली. पिंपरी-चिंचवड शहरातील तळवडे परिसरात या दुहेरी हत्याकांडाची घटना घडली. विवाहबाह्य संबंधातून हत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे पिंपरी-चिंचवडमध्ये खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवडच्या तळवडे येथील डाऊन टाऊन हॉटेलच्या मागे दोघांची हत्या करण्यात आली. जगन्नाथ पुंडलिक सरोदे (वय ५६ वर्षे) आणि मंगला सुरज टेंभरे (वय ३० वर्षे) या दोघांची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली. मध्यरात्री एक ते दोन वाजताच्या दरम्यान ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच देहू रोड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणाचा पोलिसांकडून तपास सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवडमधील तळवडे येथील डाऊन टाऊन हॉटेलच्या मागे बांधकाम सुरू असलेल्या कंपनीजवळ या दोघांची हत्या करण्यात आली. जगन्नाथ सरोदे हे मजुरी करत होते. ते तळवडेत राहत होते. पण मुळचे अकोल्याचे होते. तर मंगला टेंभरे ही महिला तळवडेमध्येच राहत असून ती मूळची अमरावतीची होती.

या महिला आणि पुरुष दोघांची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली. दोघांच्याही तोंड, हात, पाय आणि शरीराच्या अनेक ठिकाणी जखमा आढळून आल्या. अनैतिक संबंधातून दोघांची हत्या झाल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. पोलिसांनी दोघांचे मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले आहेत. सध्या देहू पोलिस अधिक तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhandara Accident: भीषण अपघातामध्ये उपसरपंचाचा मृत्यू, कारने दुचाकीला चिरडलं नंतर...

Kalyan Dombivli Water : कल्याण डोंबिवलीकरांसाठी महत्त्वाची बातमी! २ जून रोजी १२ तास पाणी पुरवठा राहणार बंद

आधारकार्डधारकांना मोफत इलेक्ट्रिक सायकल? इलेक्ट्रिक सायकलसंदर्भात मोदींची घोषणा?

देशात कागदी चलनाचे दिवस संपणार? RBI प्लास्टिकच्या नोटा चलनात आणणार?

Thane Water Cut: ठाणेकरांसाठी महत्वाची बातमी, ३ जून रोजी पाणीपुरवठा राहणार बंद, कोणकोणत्या भागांना बसणार फटका?

SCROLL FOR NEXT