Dombivli Crime News  Saam Digital
क्राईम

Dombivli Crime News: नात्याला काळीमा! काकाकडून अल्पवयीन पुतणीवर अत्याचार, डोंबिवलीतील धक्कादायक घटना

Dombivli Crime News: डोंबिवलीत धक्कादायक घटना घडली आहे. डोंबिवलीत काका-पुतणीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे.

Vishal Gangurde

अभिजीत देशमुख

Dombivli Crime News:

डोंबिवलीत धक्कादायक घटना घडली आहे. डोंबिवलीत काका-पुतणीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. अल्पवयीन मुलीवर सावत्र वडिलांच्या भावानेच लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी काकाला बेड्या ठोकल्या आहेत. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, डोंबिवलीतील पूर्वेतील ग्रामीण भागात धक्कादायक घटना घडली आहे. या भागात १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर सावत्र वडिलांच्या भावाने अत्याचार केल्याची घटना घडली आहे.

गेल्या वर्षभरापासून हा नराधम तिच्यावर लैंगिक अत्याचार करत असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली आहे. पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

नेमकं काय घडलं?

डोंबिवली पूर्वेकडून ग्रामीण भागात सदर पीडित १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी आई आणि सावत्र वडिलांसोबत राहते. तिच्या सावत्र वडिलांच्या भावाची या अल्पवयीन पीडितेवर वाईट नजर होती. गेल्या वर्षभरापासून हा नराधम तिच्यावर लैंगिक अत्याचार करत होता.

या अत्याचाराबाबत कोणाला सांगितलं तर तुला सोडणार नाही, अशी धमकी या काकाने पीडितेला दिली होती. त्रास असह्य झाल्याने पीडितेने याबाबत तिच्या आईला माहिती दिली. त्यानंतर त्यांनी या प्रकरणी पीडितेने मानपाडा पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांत धाव घेत पीडितेने तक्रार नोंदवली. या तक्रारीनुसार पोलिसांनी या नराधमाला बेड्या ठोकल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

Alu Vadi Recipe: रोज मुलांना डब्यात काय द्यायचं? टेन्शन सोडा, बनवा कुरकुरीत आळू वडी; वाचा रेसिपी

Heart attack: हार्ट अटॅकचा धोका वाढवतात या 9 गोष्टी; लक्षणं ओळखून वेळीच उपचार करा

KKK 15 Winner : 'खतरों के खिलाडी १५' च्या ट्रॉफीवर कोणी कोरलं नाव? प्राईज मनीसोबत मिळाली एकापेक्षा एक आकर्षक बक्षिसे

Ujjal Bhuyan : "शरीरातून आत्मा बाहेर काढण्यासारखे..."; SIR मोहिमेवर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींचे सर्वात मोठे विधान

SCROLL FOR NEXT