Dombivli Crime News Saam TV
क्राईम

Dombivli Crime News : शिकवणी वर्ग घेणाऱ्या शिक्षकाचे ८ वर्षीय मुलीवर अत्याचार; डोंबिवलीतील घटनेने संताप

Crime News: डोंबिवलीत शिकवणी वर्ग घेणाऱ्या शिक्षकाने आठ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केले. या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. शिक्षक ओडिशाला पळून जाण्याच्या तयारीत होता. त्यावेळीच पोलिसांनी त्याला अटक केली.

Ruchika Jadhav

अभिजित देशमुख, डोंबिवली, 09 डिसेंबर, 2023

Domabivali News:

डोंबिवलीत संतापजनक घटना घडली आहे. शिकवणी वर्ग घेणाऱ्या शिक्षकानं आठ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केले. मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी शिक्षकाला अटक केली आहे. आरोपी त्याच्या मूळ गावी पळून जाण्याच्या तयारीत होता. त्याआधीच पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

कल्याणमध्ये (Kalyan) राहणारा शिक्षक (Teacher) जनरल नॉलेज या विषयाची शिकवणी घेतो. या कोचिंग क्लासमध्ये शिकणारी आठ वर्षीय मुलगी क्लासवरून घरी आल्यानंतर अस्वस्थ होती. तिची मानसिक स्थिती बघून कुटुंबीयांनी तिच्याकडे विचारणा केली. आधी तर मुलगी काही सांगण्याच्या मनस्थितीत नव्हती. मात्र तिला तिच्या कुटुंबीयांनी विश्वासात घेत विचारणा केली. त्यावेळी तिने जे सांगितले ती घटना ऐकून सर्वांना धक्काच बसला.

मुलीच्या क्लासमधील शिक्षक तिच्यावर लैंगिक अत्याचार करत होता. मुलीने ही घटना सांगितल्यावर तिच्या नातेवाईकांनी मानपाडा पोलीस ठाण्यात धाव घेतली. मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक होनमाने यांनी त्वरीत संबंधित शिक्षकाला अटक करण्यासाठी पोलीस पाठवले.

पोलीस त्याच्या घरी पोहचले, त्यावेळी तो पळून जाण्याच्या तयारीत होता. पोलीस अधिकारी सुनील तारमळे यांनी त्याला तात्काळ ताब्यात घेतले. या प्रकरणात आरोपीला अटक करण्यात आली आहे. तसेच पुढील तपास एसीपी सुनिल कुऱ्हाडे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक होनमाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी निशा चव्हाण करीत आहेत. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या शिक्षकाच्या कृत्यामुळे परिसरातील नागरिक संताप व्यक्त करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बारामतीची निवडणूक बिनविरोध नाही, राहुरीतही काँग्रेस उमेदवार देणार, शरद पवारांची नेमकी भूमिका काय?

मोठी बातमी! फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात PSI ला जामीन, पण बदनेपुढे ठेवल्या ३ अटी, 5 महिन्यांनी येणार तुरुंगाबाहेर

Maharashtra Live News Update : भोंदू अशोक खरातचे काळे कारनामे समोर आल्यानंतर अंनिस आक्रमक

Bank OTP: बँकेच्या OTP ची कटकट संपणार! व्हेरिफिकेशनसाठी नवीन प्रणाली लागू होणार | VIDEO

Pune : पुण्यात मोठी दुर्घटना! रिंग रोडच्या कामावेळी ऑपरेटरचा दुर्दैवी मृत्यू; कामगारामध्ये संतापाची लाट

SCROLL FOR NEXT