youth killed by hitting his head on the road Saam Tv News
क्राईम

Dhule Crime : दुचाकीने जाताना जोरदार धडक दिली, खाली पडताच डोके रस्त्यावर आपटले; १७ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या

Dhule Murder News : धुळ्यातील घटनेतील दोघा संशयितांनी १७ वर्षीय तरुणाची सिमेंटच्या रस्त्यावर डोके आपटून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. फैजल अहमद अन्सारी असं मृत तरुणाचं नाव आहे.

Prashant Patil

भूषण अहिर, साम टीव्ही

धुळे : राज्यात गुन्हेगारीचं आलेख हा वाढतच आहे. पुणे बीडसारख्या शहरात तर गुन्हेगारीने अक्षरश: धुमाकूळ घातलेला आहे. अशीच एक धक्कादायक घटना धुळे शहरात घडली आहे. एका तरुणाच्या निर्घृण हत्येनं जिल्हा पुन्हा हादरला आहे. घटनेतील दोघा संशयितांनी १७ वर्षीय तरुणाची सिमेंटच्या रस्त्यावर डोके आपटून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. फैजल अहमद अन्सारी असं मृत तरुणाचं नाव आहे. नंदी रोड परिसरामध्ये दोघा संशयितांनी फैजलला दुचाकीने जोरदार धडक दिली, आणि त्यानंतर रस्त्यावर फैजलचे डोके आपटून त्याची निर्घृणपणे हत्या केली आहे.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच चाळीसगाव रोड पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि विविध तपास यंत्रणांच्या माध्यमातून तरुणाच्या या हत्येचा तपास सुरू केला आहे. या प्रकरणी चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यात संशयित दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तातडीने कारवाई करत दोन्ही संशयित तरुणांना ताब्यात घेतलं आहे आणि त्यांची कसून चौकशी देखील सुरू केली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

चिकन विक्रीचा वाद टोकाला

दरम्यान, बीडमध्ये देखील एका १७ वर्षीय तरुणाचा सिमेंटच्या नाल्यावर डोके आपटून त्याची हत्या करण्यात आलेली आहे. गेल्या काही महिन्यांपासून बीडमधील गुन्हेगारीच्या घटनांमुळे बऱ्याच गावातील वातावरण ढवळून निघालं आहे. दिवसाढवळ्या बीडमध्ये हत्या, बंदुकीचा धाक दाखवून लूटमार, किरकोळ कारणावरून कोयत्याने वार, या कारणामुळे बीड गुन्हेगारीच्या केंद्रस्थानी आले आहे. अशातच बीडमध्ये आणखी एक धक्कादायक घटना घडली आहे.

चिकन विक्रीच्या किरकोळ वादातून एका अल्पवयीन मुलाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. मुलाला उचलून आधी सिमेंटच्या नाल्यावर आदळले. यातच त्याचा मृत्यू झाला आहे. घटनेनंतर अल्पवयीन मुलाने पलायन केले आहे. आरोपीचा शोध सध्या पोलीस घेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना कर्ज नाही; अजित पवारांचं आश्वासन हवेत विरलं, कारण काय?

Maharashtra Live News Update: आज राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र; तब्बल १९ वर्षानंतर एकत्र

Saturday Horoscope : मोठी स्वप्न पूर्ण होतील, दिवस चांगला जाणार; ५ राशींच्या लोकांचं नशीब उजळणार

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

SCROLL FOR NEXT