dhule local crime branch seized 55 lakhs arrests three Saam Digital
क्राईम

Dhule Crime : लोकसभेच्या पार्श्वभूमीवर धुळ्यात एलसीबीची माेठी कारवाई, 55 लाखांची रोकड जप्त; तिघांना घेतले ताब्यात

Dhule Police News : पैसे नेमके कशासाठी व कोणी आणले याची चाैकशी केली. त्यानंतर सर्व पैसे पाेलिसांनी जप्त केले. पुढील तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग करीत आहे.

भूषण अहिरे

धुळे लोकसभा मतदारसंघात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाची करडी नजर असल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे. धुळे येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने नुकतीच एका व्यक्तीकडून 55 लाख रुपयांची रोकड जप्त केली आहे. या प्रकरणी पाेलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे अशी माहिती पोलिस अधीक्षक श्रीकांत धीवरे यांनी माध्यमांना दिली. (Maharashtra News)

धुळे जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिस दल सर्वच संशयास्पद हालचालींवर करडी नजर ठेवून आहेत. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला एका गुप्त माहितीदारामार्फत एकाकडे त्याच्या बॅगेत जवळपास 55 लाख रुपये असल्याची माहिती मिळाली. ही रक्कम त्याने दुकानात ठेवलेली आहे असेही पाेलिसांना त्याने सांगितले.

स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने मिळालेल्या माहितीनुसार संबंधित ठिकाणी जाऊन छापा टाकला. त्या ठिकाणी बॅगेमध्ये पोलिसांना 55 लाख रुपयांची रोकड आढळून आली. पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले. पैसे नेमके कशासाठी व कोणी आणले याची चाैकशी केली. त्यानंतर सर्व पैसे पाेलिसांनी जप्त केले. पुढील तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग करीत आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरसंघचालक मोहन भागवत यांच्या भेटीला

Marriage Line in Palmistry: लग्न कधी होणार, कसा मिळेल पार्टनर? हातावरील ही रेषा देते महत्त्वाचे संकेत!

डायबिटिस पेशंटसाठी 10 नैसर्गिक उपाय, हे पदार्थ खा ब्लड शुगर राहील कंट्रोलमध्ये

Accident News : देवीच्या मंदिराबाहेर भयंकर घडलं! भरधाव कारची भाविकांना धडक; ३ जणांचा जागीच मृत्यू

White vs Yellow Ghee : पांढरे की पिवळे तूप? आरोग्यासाठी जास्त फायदेशीर काय? रोज खाण्यापूर्वी जाणून घ्या

SCROLL FOR NEXT