Dhule Crime Saam Tv
क्राईम

Dhule Crime News: बोरं तोडली म्हणून वृद्ध व्यक्तीला शेतकऱ्याची जबर मारहाण, गुन्हा दाखल करण्यासाठी नागरिक आक्रमक

Farmer Beat Elder Person: बोरं तोडल्याच्या वादावरून एका वयोवृद्ध व्यक्तीला मारहाण केल्याची घटना घडली आहे. ही धक्कादायक घटना शिरपूर येथील वनावद गाव परिसरात घडली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Beat Elder Person In Dhule

शिरपूर येथील वनावद गाव शिवारात (Dhule) खाण्यासाठी बोरं तोडल्याच्या कारणावरून एका वयोवृद्ध इसमास शेतकऱ्याने जबर मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या संदर्भातील मारहाण करतानाचा व्हिडिओ देखील काढण्यात आला आहे. संबंधित वृद्ध व्यक्तीस बोरं का चोरले? अशी विचारणा करत संबंधित शेतकऱ्याने जबर मारहाण केली आहे. (Latest Crime News)

या घटनेनंतर नागरिक चांगलेच आक्रमक झाले आहेत. या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जात आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

वृद्ध व्यक्तीस जबर मारहाण

शेतकऱ्याने केलेल्या मारहाणीमुळं वृद्ध व्यक्ती जखमी झाली आहे. बोरं तोडली, या क्षुल्लक कारणावरून मारहाण केल्याची घटना घडली आहे.

अनुसूचित जाती प्रतिबंधक कायद्यान्वये ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार संबंधितावर गुन्हा दाखल (Farmer Beat Elder Person) करण्याची मागणी आदिवासी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांतर्फे करण्यात आली आहे. या व्हिडिओमध्ये संबंधित शेतकरी बोरं तोडणाऱ्या वृद्ध व्यक्तीस जबर मारहाण करीत असल्याचं दिसून येत आहे. या घटनेमुळे परिसरात चांगलाच गोंधळ निर्माण झाला आहे.

पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा

पोलीस प्रशासनातर्फे या संदर्भातील माहिती घेऊन पुढील तपास करण्याचे काम सुरू आहे. जर पोलीस प्रशासनातर्फे या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला नाही, तरदेखील संबंधित आदिवासी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला (Dhule Crime) आहे.

या घटनेमुळं परिसरात चांगलीच खळबळ झाली आहे. संबंधित नागरिक देखील अत्यंत संतप्त झाले आहेत. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

चुलीवर स्वयंपाक करताना आईला मिठी मारली; उकळते दूध अंगावर पडून २ वर्षांच्या मुलाचा मृत्यू

Maharashtra Live News Update: पुण्यात तरुणाची निर्घृण हत्या, किरकोळ वादातून मारहाण CCTV व्हायरल

Weather update: देशावर यंदा दुष्काळाचं सावट,जागतिक हवामान संघटनेच्या अंदाजानं शेतकऱ्यांचं टेन्शन वाढलं

Fact Check: खरंच सरकारनं गॅस सिलिंडरचा पुरवठा बंद केला? जाणून घ्या व्हायरल मेसेजमागचं सत्य

ICC Ranking : टी २० रँकिंगमध्ये वर्ल्डकप जिंकणाऱ्या भारताचा दबदबा; संजू सॅमसननं घेतली मोठी झेप, टॉप १० मध्ये कोण-कोण?

SCROLL FOR NEXT