Dhule Crime Saam Tv
क्राईम

Dhule Crime : प्रेयसीच्या कुटुंबाची मारहाण, प्रियकराचा मृत्यू; धुळे जिल्ह्यातील धक्कादायक घटना

Boyfriend death due to beating by girlfriend family : प्रेयसीच्या कुटुंबीयांनी मारहाण केल्यामुळे तरूणाचा मृत्यू झालाय. धुळे जिल्ह्यात ही घटना घडलेली आहे.

Rohini Gudaghe

विनोद जिरे, साम टीव्ही धुळे

धुळे जिल्ह्यात एका तरूणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आलीय. प्रेयसीला तिच्या घरी भेटायला गेला. त्यामुळे तरूणाला प्रेयसीच्या कुटुंबीयांनी जबर मारहाण केली. या घटनेत तरूणाचा मृत्यू झाल्याचं समोर आलंय. ही घटना साक्री तालुक्यात घडल्याची माहिती मिळतेय. आपण या घटनेबद्दल सविस्तर जाणून घेवू या.

प्रियकराचा मृत्यू

धुळे जिल्ह्यात साक्री तालुक्यातील निजामपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये प्रियकराला प्रेयसीच्या घरी जाऊन भेटणं जीवावर बेतलं आहे. प्रेयसीने भेटायला बोलावलं म्हणून तरूण तिच्या घरी भेटायला (Dhule Crime News) गेला. परंतु याची भनक प्रेयसीच्या घरच्यांना लागल्यानंतर संतापलेल्या प्रेयसीच्या कुटुंबीयांनी प्रियकराला बेदम मारहाण केली असता या मारहाणीमध्ये प्रियकराचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

तरूणाला बेदम मारहाण

अजय भवरे (वय-२०) असं मयत प्रियकराचे नाव (Dhule News) आहे. संबंधित मुलीचे आणि मयत युवकाचे प्रेम संबंध असताना, मुलीनेच आपल्याला भेटायला बोलावले असल्याची जबाब मृत्यूपूर्वी प्रियकराने पोलिसांना दिलाय. डोक्याला जबर मारहाण झाल्यामुळेच युवकाचा उपचारादरम्यान रुग्णालयामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर मृत्यूमुखी पडलेल्या युवकाच्या कुटुंबीयांनी आणि परिसरातील नागरिकांनी (Crime News) निजामपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये ठिय्या मांडला.

धुळे जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार

मारेकऱ्यांना तात्काळ अटक करत त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करा, अशी मागणी मृत तरूणाच्या कुटुंबीयांनी केलीय. निजामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील कारवाई करीत (Boyfriend death) आहेत. प्रेयसीच्या भेटायला गेल्याने तिच्या कुटुंबियांकडून प्रियकराला बेदम मारहाण केली. या मारहाणीत प्रियकराचा मृत्यू झाला असून परिसरात खळबळ उडालीय. ही घटना धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील निजामपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. हा धक्कादायक प्रकार प्रेम प्रकरणातून घडला असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: - विधान परिषद निवडणुकीची आज मतमोजणी, निकालाकडे सर्वांचे लक्ष

Monday Horoscope : रखडेलेली सर्व कामे पूर्ण होणार, कामगारांची होणार चांदीच चांदी; वाचा आजचे राशीभविष्य

Best Bus Strike: अखेर तोडगा निघालाच! बेस्टचा संप मागे, कर्मचाऱ्यांना मिळणार २००० रुपये मासिक हंगामी वाढ

ओमराजे निंबाळकरांचं अखेर ठरलं! ठाकरेंच्या मनधरणीच्या प्रयत्नांना अपयश

मुलीला वाचवण्यासाठी बाप बिबट्याशी भिडला; मृत्यूच्या जबड्यातून चिमुकलीची सुटका

SCROLL FOR NEXT