Dharashiv news three dead bodies found under babhulgaon bridge Saam Tv
क्राईम

Dharashiv News : धाराशिव हादरलं! पुलाखाली पाण्यात आढळले ३ मृतदेह; अपघात की घातपात?

Dharashiv Crime News : पाण्यातून बाहेर काढलेल्या ३ मृतदेहांपैकी पुरुषाच्या मृतदेहाची ओळख पटली आहे. तर दोन्ही महिलांची ओळख पटवण्याचे काम सुरु आहे. पोलिसांनी या घटनेचा अधिक माहिती मिळवण्यासाठी तपास सुरु केला आहे.

Yash Shirke

Dharashiv News : धाराशिवमधून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. धाराशिवच्या तुळजापूर तालुक्यातील एका गावात पुलाखाली तीन मृतदेह आढळले आहेत. पोलिसांनी पाण्यातून मृतदेह बाहेर काढून तपासाला सुरुवात केली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, धाराशिवमधील बाभळगावतील पुलाखाली तीन मृतदेह आढळले आहेत. यातील दोन मृतदेह हे महिलांचे, तर एक मृतदेह पुरुषाचा आहे. हे तीनही मृतदेह दोन दिवसांपूर्वी पाण्यात पडल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. दरम्यान हा प्रकार अपघात की घातपात आहे याचा तपास स्थानिक पोलीस करत आहेत.

पाण्यातून मृतदेह काढल्यानंतर त्यांची ओळख पटवण्याचे काम सुरु झाले. यातील पुरुषाची ओळख पटली आहे. मृत व्यक्ती आनंदनगर मुरुम येथील पुरुष रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. तर दोन्ही महिलांच्या मृतदेहाची ओळख पटण्याचे काम सुरु आहे. ही घटना बाभळगावजवळील सोलापूर-हैदराबाद महामार्ग क्रमांक ६५ वर घडली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कोकणातून तटकरेंच्या मुलाची बिनविरोध निवड; महायुतीत खदखद, शिंदेसेनेची फरफट

इंडिया आघाडीला मोठा धक्का; ३० खासदार असलेल्या पक्षाने फिरवली महत्त्वाच्या बैठकीकडे पाठ

TMC Crisis: ममता बनर्जींना आणखी एक जबर धक्का; तब्बल २० खासदार पक्ष सोडण्याच्या तयारीत

Rain Alert : १९ राज्यांना वादळी वाऱ्यांसह पाऊस झोडपून काढणार, ८० किमी वेगाने वाहणार वारे; हवामान खात्याचा इशारा

Podi Idli Recipe: सकाळी नाश्त्यासाठी झटपट घरच्या घरी बनवा टेस्टी पोडी इडली, वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT