Dharashiv Dowry News Representative photo
क्राईम

Dharashiv Crime: वीस लाखांच्या हुंड्यासाठी पत्नीचा छळ, प्राध्यापकावर गुन्हा दाखल

Dharashiv Dowry News: धाराशिवमधील एका प्राध्यापकाने हुंड्यासाठी पत्नीचा छळ केल्याची घटना घडलीय. याप्रकरणी पोलिसात पत्नीने तक्रार करण्यात आली असून गुन्हा दाखल करण्यात आलाय.

Bharat Jadhav

बालाजी सुरवसे, साम प्रतिनिधी

पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरणाने हुंडाबळीचा मुद्दा परत एकदा ऐरणीवर आलाय. धाराशिवमध्येही इंजीनियरिंग कॉलेजच्या प्राध्यापकाचा एक प्रताप समोर आलाय. हुंड्यासाठी प्राध्यापकाने पत्नीचा छळ केलाय. याप्रकरणी महिलेने पोलिसात तक्रार दाखल केलीय.

पैशांसाठी पती आणि सासरच्या मंडळींकडून मानसिक आणि शारीरिक छळ होत असल्याची तक्रार महिलेने पोलिसात केलीय. आई-वडिलांकडून २० लाख रुपये आण, अशी मागणी सासरच्यांकडून केली जातेय. त्यासाठी आपला छळ केला, जातोय असा विवाहितेने आरोप केलाय. या महिलेचा पती इंजीनियरिंग कॉलेजचा प्राध्यापक आहे. सासर्‍यांच्या मृत्यूनंतर छळ सुरू झालाय असा आरोप विवाहितेनं केलाय. या महिलेला सहा आणि चार वर्षांची दोन मुलं आहेत.

या कौटुंबिक हिंसाचार प्रकरणी विवाहितेनं पती,दीर,सासू,नणंद आणि जावाविरोधात आनंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय. अजीम शेख असं पतीचे नाव आहे. धाराशिवमधील एका राजकीय नेत्याच्या कॉलेजमध्ये शेख प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.

लग्नात मनासारखा हुंडा न दिल्याने छळ

काही दिवसांपूर्वी पुण्यात एका विवाहितेनं आत्महत्या केल्याची घडली होती. हुंड्यासाठी सासरच्या मंडळीकडून महिलेचा छळ केला जात होता. छळाला कंटाळून एका विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरू केलाय. देवकी उर्फ दीपा प्रसाद पुजारी (वय वर्ष २२) असे मृत महिलेचे नाव आहे.

तिने गळफास घेत आयुष्य संपवलं या प्रकरणी दीपाचे वडील गुरुसंगप्पा म्यागेरी यांनी हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. तक्रारीनंतर पती प्रसाद चंद्रकांत पुजारी, दीर प्रसन्ना चंद्रकांत पुजारी, सासू सुरेखा चंद्रकांत पुजारी आणि सासरे चंद्रकांत पुजारी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Janshatabdi Express : जनशताब्दी एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड; पेण स्थानकात ३ तासांपासून रेल्वे रखडली, प्रवाशांचे हाल

Aloo Tikki Recipe: संध्याकाळच्या नाश्त्यासाठी घरच्या घरी बनवा कुरकुरीत आलू टिक्की; वाचा सोपी रेसिपी

Dahi : आंबट दही फेकून देऊ नका,  ५०% लोकांना फायदे माहीतच नाहीत, ५ वा उपाय थेट पैसे वाचवेल

Maharashtra News Live Update: आरक्षण उपवर्गीकरणासाठी मुंबईत मातंग समाज आक्रमक

Yuzvendra Chahal: युजवेंद्र चहलचा क्रिकेट टीमला अलविदा, पोस्ट पाहून चाहते संभ्रमात

SCROLL FOR NEXT