Delhi Vasant Kunj Crime News Saam TV
क्राईम

Shocking News : धक्कादायक! पत्नीला कर्करोगाने हिरावलं, गरीबीमुळे पतीला नैराश्य; ४ मुलींसह स्वत:लाही संपवलं

Delhi Vasant Kunj Crime News : पत्नीच्या निधनानंतर नैराश्यात गेलेल्या पतीने आपल्या ४ अपंग मुलींना विष देऊन मारलं, त्यानंतर स्वत:लाही संपवून टाकलं.

Satish Daud

घरात अठरा विश्व दारिद्र्य, त्यात पत्नीला कर्करोगाने हिरावून घेतलं. यामुळे पतीला जबर धक्का बसला. त्याने कुठलाही विचार न करता आपल्या ४ मुलींना विष दिलं. त्यानंतर स्वत:लाही संपवून टाकलं. मन सुन्न करणारी ही घटना दक्षिण दिल्लीतील रंगपुरी गावात शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास घडली. पोलिसांनी पाचही जणांचे मृतदेह ताब्यात घेतले असून शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले आहेत. या घटनेनं बुऱ्हाडी प्रकरणाची आठवण करून दिली आहे.

हिरालाल (वय ५०) नीतू (वय १८) निशी (वय १५) नीरू (वय १०) आणि निधी (वय ८) अशी मृतांची नावे आहेत. या चारही मुली अपंग होत्या, अशी माहिती समोर आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ५० वर्षीय हिरालाल हे मूळ बिहारमधील छपरा जिल्ह्यातील मसरख गावचे रहिवासी होते. कुटुंबाचे पोट भरण्याचे ते काही वर्षांपूर्वी दिल्लीतील आले होते.

रंगपुरी गावात त्यांनी किरायाने घर घेतले होते. सुतारकाम करून हिरालाल आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. सगळं काही सुरळीत असताना हिरालाल यांच्या पत्नीला कर्करोगाने ग्रासलं. जीवापाड प्रयत्न करूनही हिरालाल त्यांना वाचवू शकले नाही. या जोडप्याची पहिली मुलगी अपंग जन्माला आली होती. सुदृढ मुलं व्हावी या इच्छेपोटी सुनीता यांनी आणखी तीन मुलींना जन्म दिला, पण त्या तिघीही अपंग झाल्या.

पत्नीच्या निधनानंतर हिरालाल आपल्या चारही मुलींची व्यवस्थित काळजी घेत होते. पण ते गरीबीमुळे नैराश्यात गेले. आपल्यानंतर मुलींचे काय होणार, याची चिंता हिरालाल यांना सतावत होते. याच तणावातून त्यांनी टोकाचं पाऊल उचललं. आपल्या चारही अपंग मुलींना त्यांनी जेवणातून विष दिलं. त्यानंतर स्वत:ही आत्महत्या करून आपली जीवनयात्रा संपवली.

दरम्यान, शुक्रवारी हिरालाल यांच्या घरातून दुर्गंधी येऊ लागली. त्यामुळे परिसरात राहत असलेल्या व्यक्तींनी त्यांचे दार ठोठावले. आतून कुठलाही प्रतिसाद न आल्याने नागरिकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. तेव्हा हिरालाल यांच्यासह त्यांच्या चारही मुलींचे मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आले. या घटनेनं परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chilli Potato Recipe: घरच्या घरी बनवा रेस्टॉरंट स्टाईल चिली पोटॅटो; वाचा खास रेसिपी

Maharashtra To Bihar Amrit Bharat Train: पुणे ते दानापुर दरम्यान धावणार ट्रेन; जाणून घ्या अमृत भारत ट्रेनचा मार्ग, कोचसंख्या टाईमटेबल अन् थांबा

Maharashtra News Live Update: कल्याणमध्ये पोलिसांची दंगा काबू योजना रंगीत तालीम, अधिकारी-अंमलदारांचा मोठा सहभाग

RBI Digital Fraud Rules: डिजिटल फसवणूक प्रकरणी आरबीआयचा मोठा निर्णय; बँक देणार नुकसान भरपाई

Maharashtra Politics: सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा झटका, 'त्या' एका निर्णयामुळे २ बड्या नेत्याचं पद गेलं

SCROLL FOR NEXT