Delhi Crime News  Saam Digital
क्राईम

Delhi Crime News: दोन मुलांची आई अन् प्रियकर हॉटेलच्या रुममध्ये गेले; ४ तासांतच घडलं भयंकर

Crime News Update: दिल्लीमधील एका ओयो रुममध्ये विवाहित तरुणी आणि प्रियकराचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली.

Gangappa Pujari

Delhi Crime News:

राजधानी दिल्लीमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दिल्लीमधील एका ओयो रुममध्ये विवाहित तरुणी आणि प्रियकराचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली. या दोघांनी चार तासांसाठी रुम बुक केली होती. मात्र बराच वेळ झाल्याने हॉटेल मालकांने पोलिसांना याबाबत माहिती दिली अन् हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला. काय आहे हे संपूर्ण प्रकरण, जाणून घ्या सविस्तर.

याबाबत अधिक माहिती अशी की, मौजपूर (Delhi) मेट्रो स्टेशनजवळील ओयो हॉटेलमधून रात्री आठ वाजण्याच्या सुमारास पोलिसांना या घटनेबाबत कॉल आला. हॉटेल कर्मचाऱ्यांनी पोलिसांना मेरठचा रहिवासी असलेला सोहराब (वय 28 वर्ष) आणि आयशा बसंत कुंज गल्ली क्रमांक-10, लोणी या दोघांनी चार तासांसाठी रुम बुक केली मात्र वेळ होऊनही दार उघडत नसल्याची माहिती दिली.

पोलिसांनी खोलीचा दरवाजा उघडून पाहिल्यानंतर धक्कादायक दृश्य समोर दिसलं. रुममध्ये सोहबराव नाईलॉनच्या दोरीला लटकला होता तर आयशा बेडवर मृतावस्थेत पडली होती. मृतदेहांशेजारी आढळलेल्या चिठ्ठीमध्ये दोघांचे एकमेंकावर प्रेम होते, म्हणून आत्महत्येचा निर्णय घेतल्याचे लिहले होते.

पोलिसांनी दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले असून अधिक तपास सुरू आहे. मृत आयशाला एक ९ वर्षांची मुलगा आणि ४ वर्षांची मुलगी अशी दोन अपत्ये असल्याची माहिती तपासात समोर आली आहे. सध्या पोलिसांकडून दोघांच्याही कुटुंबियांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weight Loss Recipe : भात खाऊनही वजन होईल कमी, वाचा 'ही' पुलावची हेल्दी रेसिपी

Maharashtra News Live Update: पत्रकाराची गळफास घेऊन आत्महत्या

IPL 2026 : KKR च्या युवा फलंदाजावर बीसीसीआयची मोठी कारवाई, रागाच्या भरात केलेलं कृत्य भोवलं

पीडितेचं नाव बदललं, मलेशियाला पाठवण्याचा डाव, TCS धर्मांतर प्रकरणाचं मालेगाव कनेक्शन आलं समोर

Bhau Kadam: एकांकिकेत काम करणाऱ्या मुलीची बहिण आवडली, हटके स्टाईल केलं प्रपोज; भाऊ कदमची फिल्मी लव्हस्टोरी

SCROLL FOR NEXT