Dombivli Crime Saam Tv
क्राईम

Dombivli Crime: नातवाला भेटायला गेलेल्या सासूला सूनेच्या कुटुंबीयांकडून अर्धनग्न करून मारहाण

Dombivli Crime: डोंबिवलीमधील खंबाळपाडा येथील गावात ही धक्कादायक घटना घडलीय. येथील एका जोडप्यात वाद सुरू आहे. पत्नीकडे घरी असलेल्या नातवाला भेटायला गेलेला वृद्ध सासूबाईला मुलाच्या सासरच्यांना बेदम मारहाण केली.

Bharat Jadhav

अभिजीत देशमुख

Dombivli Crime:

आपल्या मुलाच्या मुलाला भेटण्यासाठी मुलाच्या सासरी गेलेल्या वृद्धी महिलेला सासरच्या कुटुंबियांनी तिचे कपडे फाडत बेदम मारहाण केल्याची घटना डोंबिवली खंबाळ पाडा भोईरवाडी परिसरात घडली. मारहाणीत दुखापत झाल्याने या महिलेवर डोंबिवलीच्या शास्त्रीनगर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी टिळक नगर पोलीस ठाण्यात महाराण करणाऱ्या महिलांसह पुरुषांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. दरम्यान या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. याप्रकरणी टिळक नगर पोलीस पुढील तपास करत आहेत. (Latest News)

डोंबिवली पूर्वेतील खंबाळपाडा येथील कांचनगाव भोईरवाडी परिसरात राहणाऱ्या अजय कुशवाहा यांचा पत्नीसोबत वाद सुरू आहे. पत्नी आपल्या मुली आणि मुलासोबत आपल्या आई-वडिलांसोबत राहते पती-पत्नीमध्ये वाद सुरू असल्याने घटस्फोट प्रक्रिया सुरू आहे. दोन दिवसांपूर्वी अजय आपल्या मुली आणि मुलाला भेटण्यासाठी आपल्या सासरवाडीत गेला होता. त्याठिकाणी आधी त्याला आपल्या मुली आणि मुलाला भेटून दिले नाही.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

नंतर त्याच्या मेव्हण्याने आपला काही मित्रांना बोलून त्या ठिकाणी अजयला बेदम मारहाण केली. मग मध्यस्थी करायला गेलेल्या अजयची आईला देखील अजयच्या सासूने मारहाण केली. या मारहाणीत अजयच्या आईचे कपडे फाटले तरीही तिला मारहाण केली. या घटनेच्या व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रकरणात डोंबिवलीतील टिळक नगर पोलिसांनी अमानुषपणे मारहाण करणाऱ्या गणेश सिंग, अरविंद सिंग ,नयना देवी यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणात टिळक नगर पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे मात्र या प्रकारे अमानुषपणे मारहाण करण्यात विरोधात ठोस कारवाई झाली पाहिजे अशी मागणी केली जात आहे. या मारहाणीत गंभीर जखमी असलेल्या अजयची आईवर डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात उपचार सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: वायुसेनेच्या माध्यमातून नीट परिक्षेच्या प्रश्न पत्रिका नागपूरात पोहचल्या

Mangal Dosh: मंगळमुळे लग्न जमेना! 'या'५ खात्रीशीर उपायांनी दूर होईल मंगळदोष

Parbhani: हनुमान मंदिराचा सभा मंडप कोसळला, ५ जणांचा मृत्यू; मृतांची नावे आली समोर

Masoor Bhaat Recipe: लहान मुलांना डब्ब्यात द्या पौष्टिक आणि चविष्ट मसूर भात, वाचा सोपी रेसिपी

चंद्रपूर गुदमरलं! साडेतीन वर्षांत 325 जणांचा मृत्यू; धक्कादायक कारण समोर

SCROLL FOR NEXT