Crime News Saam Tv
क्राईम

Crime News: प्रेमसंबंधाचा रक्तरंजित शेवट; एक्स गर्लफ्रेंडवर २० हून अधिक वार, नंतर तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

Punjab Crime News: पंजाबच्या मोहालीतील एका खाजगी कंपनीत महिलेची तिच्या सहकाऱ्याने वार करून हत्या केली. घटनेनंतर आरोपीने स्वतःच्या गळ्यावर वार करत आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली.

Shruti Vilas Kadam

Crime News: पंजाबमधील मोहाली येथे घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. एका खाजगी कंपनीत काम करणाऱ्या महिलेची तिच्याच सहकाऱ्याने कार्यालयात घुसून निर्घृण हत्या केली. या घटनेनंतर आरोपीने स्वतःच्या गळ्यावर वार करत आत्महत्येचाही प्रयत्न केला. ही संपूर्ण घटना कार्यालयातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.

एनडीटिव्हीच्या माहितीनुसार, हरविंदर मान उर्फ हॅरी असे आरोपीचे नाव आहे. तर मृत महिलेचे नाव डिंपल आहे. दोघेही मोहालीतील एका पॅकर्स अँड मूव्हर्स सेवा देणाऱ्या खासगी कंपनीत गेल्या तीन वर्षांपासून एकत्र काम करत होते. या काळात त्यांच्यात मैत्री झाली होती आणि ते रिलेशनशिपमध्ये आले. मात्र काही काळापूर्वी त्यांचे ब्रेकअप झाले होते.

गुरुवारी सायंकाळी सुमारे ७.४० वाजण्याच्या सुमारास आरोपी कार्यालयात पोहोचला. त्यावेळी डिंपल आपल्या डेस्कवर बसून काम करत होती. सीसीटीव्ही फुटेजनुसार, आरोपीने अचानक तिच्यावर मागून धारदार शस्त्राने हल्ला केला. जीव वाचवण्यासाठी महिलेने पळण्याचा प्रयत्न केला, मात्र आरोपीने तिचा पाठलाग करत तिला कंपनीच्या मेन गेटवर गाठले. त्यानंतर तिच्या केसांना धरून ओढत तिच्यावर पुन्हा पुन्हा वार केले.

कार्यालयातील इतर कर्मचाऱ्यांनी आरोपीला रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचा आक्रमकपणा इतका होता की कोणालाही त्याला थांबवू शकले नाही. डिंपल जमिनीवर कोसळल्यानंतरही आरोपीने तिच्यावर २० हून अधिक वेळा वार केल्याचे तिथल्या लोकांनी सांगितले आहे. हल्ल्यानंतर आरोपी कार्यालयाच्या आत गेला आणि स्वतःच्या गळ्यावरही वार करण्यास सुरुवात केली. त्याने स्वतःच्या गळ्यावर तब्बल ३० हून अधिक वार केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. घटनेनंतर घाबरलेल्या कर्मचाऱ्यांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली.

पोलिसांनी दोघांनाही तातडीने जवळच्या फोर्टिस रुग्णालयात त्या दोघांना दाखल केले. मात्र डॉक्टरांनी डिंपलला मृत घोषित केले, तर आरोपीची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, या हत्येमागे नातेसंबंधातील वाद कारणीभूत असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. तरी पोलिस सर्व बाजूंनी तपास करत आहेत. फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळावरून पुरावे गोळा केले असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच दोघांच्या कुटुंबीयांनाही घटनेची माहिती देण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

EPFO शटडाऊन! ३ दिवस बंद राहणार PF पोर्टल, 'ही' कामं करताना येणार अडचणी; ५ पर्याय कोणते?

Maharashtra News Live Update: शिवसेना शिष्टमंडळाची महावितरण अधिकाऱ्यांना निवेदन देत आंदोलनाचा इशारा

Chilli Potato Recipe: घरच्या घरी बनवा रेस्टॉरंट स्टाईल चिली पोटॅटो; वाचा खास रेसिपी

Maharashtra To Bihar Amrit Bharat Train: पुणे ते दानापुर दरम्यान धावणार ट्रेन; जाणून घ्या अमृत भारत ट्रेनचा मार्ग, कोचसंख्या टाईमटेबल अन् थांबा

RBI Digital Fraud Rules: डिजिटल फसवणूक प्रकरणी आरबीआयचा मोठा निर्णय; बँक देणार नुकसान भरपाई

SCROLL FOR NEXT