Vashim Saam Tv
क्राईम

Crime News : 'तो' व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी; बदनामीच्या त्रासाला कंटाळून महिलेनं आयुष्य संपवलं

Washim News : वाशिमच्या कारंजा शहरात विवाहित महिलेला व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत शारीरिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला. या त्रासाला कंटाळून महिलेने आत्महत्या केली. पोलिसांनी एकाला अटक केली असून दुसरा फरार आहे.

Alisha Khedekar

वाशीममध्ये धक्कादायक घटना घडली आहे. वाशिमच्या कारंजा शहरात विवाहित महिलेचे शारीरिक संबंधाचे व्हिडीओ वायरल करण्याची धमकी दिल्याने महिलेने आत्महत्या केली आहे. पीडित महिलेच्या पतीने पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली असून संशयित असलेल्या गुन्हेगारांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

वाशिमच्या कारंजा शहरात एका विवाहित महिलेला शारीरिक संबंधाचे व्हिडीओ वायरल करण्याची धमकी दिल्याने महिलेने आत्महत्या केली आहे. पीडित महिलेसोबत ओळख करून तिला विश्वासात घेत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. केलेल्या शारीरिक संबंधाचे व्हिडिओ तयार करून ते व्हायरल करण्याची धमकी देत पुन्हा शारीरिक संबंध करण्याची मागणी केली आणि पोलिसात तक्रार दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली.

या त्रासाला कंटाळून पीडितिने आत्महत्या केली असल्याचं पीडितेच्या नवऱ्याने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या घटनेचा पोलीस तपास करत असून या प्रकरणात पीडित महिलेचा कथित प्रियकर शेख मोबीन शेख वाजीद आणि त्याचा भाऊ शेख अमीन शेख वाजीद या दोघांविरुद्ध कारंजा पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी यातील आरोपी शेख अमीन शेख वाजीद यास अमरावती येथून अटक केली असून, दुसरा आरोपी अद्यापही फरार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मध्य रेल्वे धावत्या लोकलमधून महिला पडली

अमृता फडणवीसांकडून जेवणासाठी निमंत्रण; मनोज जरांगेंनी काय उत्तर दिलं? पाहा VIDEO

मी आरक्षण सोडण्यास तयार; केंद्रीय मंत्र्यांचं मोठं विधान, पण ठेवली ‘ही’ अट

Main Door Vastu Tips: घराच्या दरवाज्याविषयी 5 महत्वाच्या गोष्टी प्रत्येकाला माहित असायला हव्यात

Ganesh Chaturthi 2026: यंदा गणपती बाप्पांचं आगमन ठरणार विशेष; हरतालिका आणि गणेश चतुर्थी एकाच दिवशी, जाणून घ्या पुजेचा मुहूर्त

SCROLL FOR NEXT