Chhatrapati Sambhajinagar Crime Saam Tv News
क्राईम

Crime News : अश्लील VIDEO दाखवत चौथीच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, शिक्षकच झाला भक्षक; संभाजीनगरमधील घटनेनं महाराष्ट्र हादरला

Chhatrapati Sambhajinagar Crime : छत्रपती संभाजीनगर शहराजवळील रांजणगाव शेनपुंजी येथील नर्सरी कॉलनीमध्ये एका शिक्षकाने चौथीत शिकणाऱ्या ११ वर्षीय विद्यार्थिनीला अश्लील व्हिडिओ दाखवत लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली.

Prashant Patil

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर शहराजवळील रांजणगाव शेनपुंजी येथील नर्सरी कॉलनीमध्ये धक्कादायक प्रकारसमोर आला आहे. खासगी शिकवणी असलेल्या टॉपर क्लासच्या ४५ वर्षीय शिक्षकाने चौथीतल्या विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना आज सकाळी उघडकीस आली आहे. या धक्कादायक प्रकाराने संपूर्ण जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे.

सुभाष जाधव असं आरोपी शिक्षकाचं नाव असून दीड वर्षापासून रांजणगाव शेपू येथे नर्सरी कॉलनीमध्ये टॉपर क्लासेस नावाने आरोपीची शिकवणी आहे. तीन दिवसांपूर्वी विद्यार्थिनीला अश्लील व्हिडिओ दाखवत नराधमाने चौथीतल्या विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केला. आज सकाळी ही घटना उघडकीस आली असून या प्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात नराधम शिक्षकाविरोधात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे.

नेमका प्रकार काय?

छत्रपती संभाजीनगर शहराजवळील रांजणगाव शेनपुंजी येथील नर्सरी कॉलनीमध्ये एका शिक्षकाने चौथीत शिकणाऱ्या ११ वर्षीय विद्यार्थिनीला अश्लील व्हिडिओ दाखवत लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली. सुभाष जाधव असं आरोपी शिक्षकाचं नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार दीड वर्षांपासून रांजणगाव शेपू येथे नर्सरी कॉलनीमध्ये टॉपर क्लासेस या नावानं आरोपीची शिकवणी आहे. एम.ए इंग्रजी एम.एड असलेल्या सुभाष जाधवसह तीन शिक्षकांनी मिळून ही शिकवणी सुरू केली होती. तीन दिवसांपूर्वी चौथीत शिकणाऱ्या ११ वर्षीय विद्यार्थिनीला नराधमाने अश्लील व्हिडिओ दाखवत अत्याचार केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Balushahi Recipe: सणासुदीला झटपट बनवा खुसखुशीत आणि पाकात मुरलेली बालूशाही, वाचा रेसिपी

Tomatoes for heart health: हृदयाच्या आरोग्यासाठी टोमॅटो फायदेशीर; पण कच्चा खावा की शिजवून? कार्डिओलॉजिस्टने दिलं उत्तर

Pitru Paksha 2026: श्राद्ध कसं करायचं? पितृ पक्षात कोणते विधी केले जातात? वाचा...

Maharashtra News Live Update: साहिल वाकोडे मृत्यू प्रकरण, चौकशी समितीने आणखी 8 आठवड्यांची मुदत मागितली

मनोज जरांगेंना मोठा झटका! निकटवर्तीयावर ४.९० कोटींचा दंड कायम

SCROLL FOR NEXT