Chhatrapati Sambhajinagar Walunj MIDC News Saamtv
क्राईम

Chhatrapati Sambhajinagar Crime: खळबळजनक! वाळुज MIDC परिसरात गोळ्या झाडून तरुणाची हत्या; छत्रपती संभाजीनगर हादरलं

Chhatrapati Sambhajinagar Waluj MIDC News: छत्रपती संभाजीनगरमधील वाळुंज एमआयडीसी परिसरात एका तरुणाची गोळ्या झाडून निर्घृण हत्या करण्यात आली. कपिल पिंपळे असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव नाव आहे.

Gangappa Pujari

छत्रपती संभाजीनगर, ता. १९ जुलै २०२४

छत्रपती संभाजीनगरमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. छत्रपती संभाजीनगरच्या वाळुंज एमआयडीसी परिसरात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. वाळूजच्या वडगाव कोल्हाटी भागात घडलेल्या या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, छत्रपती संभाजीनगरमधील वाळुंज एमआयडीसी परिसरात एका तरुणाची गोळ्या झाडून निर्घृण हत्या करण्यात आली. कपिल पिंपळे असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव नाव आहे. या भयंकर घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला आहे.

तरुणाच्या छातीत गोळ्या घालून आरोपी बंदूक तिथेच टाकून घटनास्थळावरून पसार झाले. पोलिसांनी पुढील तपासणीसाठी मृतदेह घाटी रुग्णालयात हलवला आहे. या हत्येमागचे कारण अद्याप समोर आले नसून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. भरवस्तीत निर्घृण हत्या करण्यात आल्याने परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे.

नाशिकमध्ये मोबाईल शॉपी फोडली; लाखोंचा ऐवज लंपास

नाशिकच्या मालेगाव शहरातील गजबजलेल्या कँम्प रस्त्यावरील एकात्मता चौक परिसरातील गगनगिरी कॉम्पलेक्स मधिल एस एस मोबाईल शॉपी दुकानाचे शटर उचकटून व काच फोडून दोघा चोरट्यांनी दुकानात प्रवेश करत जवळपास पाच लाख रुपये किमतीचे ३७ महागडे मोबाईल चोरुन नेल्याची घटना घडली आहे. चोरीची घटना दुकानातील सीसीटीव्ही कॅमे-यात कैद झाली आहे. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झाला असून पोलिस सीसीटीव्हीच्या आधारे चोरट्यांचा शोध घेत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : लाडक्या बहिणीचं पोर्टल बंद, आता नव्याने नोंदणी होणार नाही - ठाकरे

Shoking News : जेवणात मीठ कमी पडल्याने, गर्भवती महिलेला गमवावे लागले प्राण

Spiritual Shells: पैशाचा पाऊस पाडणारी कौरीची शेल कशी तयार होते? याचे महत्त्व काय आहे?

Dhule Tourism : वीकेंडसाठी धुळे परफेक्ट लोकेशन, 'ही' ३ ठिकाणं पाहताच आठवड्याचा थकवा जाईल पळून

Maharashtra Live News Update: विठ्ठल रुक्मिणी मंदिर फुलांनी सजले

SCROLL FOR NEXT