61-Year-Old Mentally Challenged Woman Physically Abused Saam Tv
क्राईम

Crime News: मानवतेला काळिमा! पहाटे दोघांनी गार्डनमध्ये नेलं अन्...; 61 वर्षीय मानसिकदृष्ट्या दिव्यांग महिलेसोबत पाशवी कृत्य

Crime News: चेन्नईतील वेलाचेरी येथे ६१ वर्षीय मानसिकदृष्ट्या दिव्यांग आणि बेघर महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली. पोलीसांनी दोन आरोपींना अटक केली आहे.

Shruti Vilas Kadam

Crime News: तामिळनाडूची राजधानी चेन्नई येथे मानवतेला हादरवून टाकणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. वेलाचेरी परिसरात ६१ वर्षीय मानसिकदृष्ट्या दिव्यांग आणि बेघर महिलेवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी पोलिसांनी बिहारमधील दोन परप्रांतीय कामगारांना अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला गेल्या दोन महिन्यांपासून वेलाचेरी बस स्थानकाजवळ राहत होती. गुरुवारी पहाटे सुमारे चार वाजण्याच्या सुमारास ती वेलाचेरीतील १००-फूट रोडवरील एचपी पेट्रोल पंपाजवळून पायी जात होती. यावेळी तेथून जाणाऱ्या काही नागरिकांच्या तिच्या पायावर रक्ताचे डाग आढळून आले. संशय आल्याने त्यांनी तातडीने पोलीस नियंत्रण कक्ष आणि १०८ रुग्णवाहिका सेवेशी संपर्क साधला.

माहिती मिळताच वेलाचेरी पोलीस ठाण्याचे गस्त घालणारे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी महिलेला तातडीने सैदापेट येथील सरकारी रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक तपासणीनंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. पुढील उपचारांसाठी तिला एग्मोर येथील सरकारी कस्तुरबा गांधी महिला व बाल रुग्णालयात हलवण्यात आले.

तपासादरम्यान पोलिसांना महत्त्वाचे धागेदोरे मिळाले. महिलेला रॅपिडो बाईकवरून एका महापालिका उद्यानाजवळील निर्जन भागात नेण्यात आल्याचे उघड झाले. तेथेच तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची माहिती समोर आली. पीडित महिलेची मानसिक स्थिती स्थिर नसल्याने ती घटनेबाबत स्पष्ट माहिती देऊ शकत नव्हती. त्यामुळे पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल लोकेशन आणि इतर तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपास सुरू केला.

या तपासातून मोहम्मद मुत्तब (२६) आणि मोहम्मद अतील (२३) या दोन आरोपींची ओळख पटली. दोघेही बिहारचे रहिवासी असून वेलाचेरी परिसरातील खानावळींमध्ये काम करत होते. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतल्यानंतर चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. परिसरात महिला एकटी असल्याचे पाहून तिला टार्गेट केल्याची माहितीही चौकशीत समोर आली.

या प्रकरणात एका १५ वर्षीय मुलालाही चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले होते. मात्र, त्याचा गुन्ह्यात सहभाग नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्याला सोडून देण्यात आले. अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असून त्यांना न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today : ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! सोन्याच्या दरात मोठा बदल; चांदी १०,००० रुपयांनी घसरली; वाचा आजचे ताजे दर

पोटावरची चरबी मेणासारबी वितळेल! रोज न चुकता मेथीच्या दाण्याचे पाणी प्या

Famous Actor : "मला बापाला मरताना नाही पाहायचंय..."; प्रसिद्ध अभिनेत्याच्या वडिलांची प्रकृती चिंताजनक, ढसाढसा रडतानाचा VIDEO व्हायरल

Maharashtra News Live Update: कालच्या मुसळधार पावसानंतर नाशिकला पाणीपुरवठा करणारे गंगापूर धरण ७० टक्के भरले

Train Cancelled : प्रवाशांसाठी मोठी बातमी! साईनगर शिर्डी एक्सप्रेससह ८ रेल्वे आज रद्द, नेमकं कारण काय? वाचा

SCROLL FOR NEXT