एका प्रेमी युगुलाने आत्महत्या केल्याची घटना सिंदखेडराजा तालुक्यातील शेंदुर्जन गावात घडलीय. हे प्रेमी युगुल गेल्या २ दिवसांपासून बेपत्ता होतं. आज या प्रेमी युगुलचे मृतदेह सूतगिरणी परिसरातील एका झाडाजवळ आढळले. या घटनेने पंचक्रोशीत एकच खळबळ उडालीय. (Latest News)
आत्महत्या केलेल्या युगुलामध्ये तरुणाचं वय २२ वर्ष तर मुलगी अल्पवयीन होती. हे दोघे गावातून दोन दिवसांपासून गायब होते, असं सांगितलं जात आहे. आज मात्र दुपारच्या वेळेस एका झाडाला लटकलेले आढळून आले. या घटनेची माहिती साखरखेर्डा पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. पोलिसांनी दोन्ही मृतदेह शवविच्छेनदासाठी पाठवण्यात आले आहे.
कुटुंबियांचा विरोधानंतर प्रेमी युगुलाने संपवलं जीवन
वाशिमच्या मालेगाव तालुक्यातही एका प्रेमीयुगुलाने गळफास गेल्याची घटना घडली होती. जऊळका पोलीस स्टेशनअंतर्गत येणाऱ्या उमदरी वनपरिक्षेत्रात ही धक्कादायक घटना घडली होती. या घटनेनं परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. वृत्तानुसार हे दोघेही वाशिम जिल्ह्यातील असून गेल्या काही वर्षांपासून त्यांचे एकमेकांवर प्रेम होते. मात्र दोघांच्याही प्रेमाला कुटुंबियांचा विरोध होता. वारंवार विनंती करून सुद्धा कुटुंबीय त्यांच्या प्रेमाची मागणी मान्य करत नसल्याने हे दोघांनाही घर सोडण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर या दोघांचा मृतदेह आढळून आलेत.
विरोधामुळे संपवलं जीवन
मुंबईच्या समता नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका प्रेमी युगुलाने आत्महत्या केल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. टेकडीवरून उडी मारून या प्रेमी युगुलाने आपलं जीवन संपवलं होतं. यातील प्रियकर हा २१ वर्षाचा होता, तर त्याची प्रेयसी ही १६ वर्षाची होती. दोघे कांदिवलीच्या जानुपाडा परिसरात शेजारीच राहत होते. या दोघांमध्ये प्रेमसंबंध होते. मात्र यांच्या प्रेमाला कुटुंबीयांचा विरोध केल्याने दोघांनी जीवनयात्रा संपवली.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.