Anupam Kher SAAM TV
क्राईम

Anupam Kher : खळबळजनक! 500 रुपयांच्या नोटांवर चक्क अनुपम खेर यांचा फोटो; बंडल पाहून पोलीस चक्रावले, तब्बल 1 कोटींच्या नोटा जप्त

Anupam Kher Picture On Currency : 500 रुपयांच्या नोटांवर चक्क अनुपम खेर यांचा फोटो असलेला एक व्हिडिओ समोर आला आहे. अहमदाबाद पोलिसांनी कोटींचा माल जप्त केला आहे.

Shreya Maskar

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये नोटांचे बंडल दिसत असून नोटांवर महात्मा गांधीजींच्या फोटो ऐवजी बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर (Anupam Kher) यांचा फोटो पाहायला मिळत आहे. अहमदाबाद पोलिसांनी सुमारे 1 कोटी 60 लाख रुपयांच्या अशा नोटा जप्त केल्या आहेत. या नोटांचा आकार, रंग मूळ नोटांसारखाच आहे. पण या खोट्या नोटा असल्याचे स्पष्ट झाले आहे.

अनुपम खेर यांनी सुद्धा हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. "पाचशे रुपयांच्या नोटेवर गांधीजींच्या फोटोऐवजी माझा फोटो???? काहीही होऊ शकते!" असे कॅप्शन देऊन त्यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये पहिल्या नजरेत कोणालाही ही नोट खरी वाटेल. मात्र तसे नाही आहे. नोटेचे डिझाईन हुबेहुब पाचशे रुपयांच्या नोटेसारखे आहे. मात्र नोटांवरील फोटो वेगळा आहे. यावरून नोट खरी नसल्याचे स्पष्ट होते. याशिवाय नोटेवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ऐवजी 'Resol Bank of India' असे लिहिले आहे.

तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता की, नोटा एकत्र ठेवण्यासाठी कागदाचा तुकडा वापरण्यात आला आहे. नुकताच 22 सप्टेंबर रोजी गुजरातच्या सुरत पोलिसांनी बनावट नोटा बनवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला होता. याप्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना अटक केली होती. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून 1 लाख 20 हजार रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या होत्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जालन्यात पोलिस-महसूलच्या पथकाचा वाळू माफियांना दणका, 3 हायवा, ट्रॅक्टरसह 64 लाखांचा मुद्देमाल जप्त

Friday Horoscope: या राशींचा आज प्रेमभंग होण्याची शक्यता आहे, वाचा राशीभविष्य

Ladki Bahin Yojana : जून उजाडला, लाडक्या बहिणींना मे महिन्याचे ₹१५०० कधी मिळणार? संभाव्य तारीख आली समोर

Rain Alert : मान्सून महाराष्ट्राच्या वेशीवर, ३१ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा अलर्ट; वाचा हवामानाचा अंदाज

Shreyas Iyer : मोठी बातमी! सूर्याचं कर्णधारपद काढलं, श्रेयस अय्यर टीम इंडियाचा 'सरपंच'; युवा वैभव सूर्यवंशीलाही संधी

SCROLL FOR NEXT