Crime News x
क्राईम

Shocking : संतापजनक! गरोदर महिलेवर सामूहिक बलात्कार; मांत्रिकाचं 'अघोरी' कृत्य

Crime News : उपचारांसाठी आलेल्या ४ महिने गरोदर असलेल्या महिलेवर मांत्रिक आणि त्यांच्या साथीदारांकडून सामूहिक बलात्कार करण्यात आला. या प्रकरणानंतर परिसरामध्ये खळबळ उडाली आहे.

Yash Shirke

Crime : उपचार करण्याच्या बहाण्याने २५ वर्षीय गर्भवती महिलेवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. महिलेला त्रास होत असल्याने तिला सासऱ्याने एका मांत्रिकाकडे उपचार करण्यासाठी नेले होते. मांत्रिकाने महिलेले खोलीत नेत तिच्यावर बलात्कार केला. मांत्रिक त्याच्या साथीदारांसह महिलेवर वारंवार बलात्कार करत होता. सदर घटना बिहारमधील मुझफ्फरपूरमध्ये घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चार महिने गर्भवती असलेल्या महिलेची प्रकृती बिघडली होती. तब्येत बरी करण्यासाठी महिलेच्या सासऱ्याने तिला एका तांत्रिकाकडे नेले. मांत्रिकाने सासरच्यांना बाहेर बसवले आणि उपचार करण्याच्या बहाण्याने महिलेला खोलीत नेले. तेथे त्याने महिलेवर अत्याचार केले. महिलेने घाबरुन कुणाला काही सांगितले नाही.

मांत्रिकाने महिलेला बोलावून तिच्यावर पुन्हा बलात्कार केला. त्यानंतर काही दिवसांनी मांत्रिकाने त्याच्या दोन साथीदारांसह महिलेवर सामूहिक बलात्कार केला. यानंतर महिलेची प्रकृती बिघडली. महिलेला स्थानिक रुग्णलयामध्ये दाखल करण्यात आले. तेव्हा पीडित महिलेने घडलेला प्रकार कुटुंबीयांना सांगितला. या प्रकरणाची माहिती समोर आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली.

ही घटना शिवाईपट्टी पोलीस स्टेशन परिसरातील मधेरा गावात घडली आहे. पोलिसांनी पीडित महिलेचा जबाब नोंदवला आहे. उपचार करण्याच्या बहाण्याने चार महिन्यांची गरोदर असलेल्या महिलेवर सामूहिक बलात्कार केल्याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाची चौकशी जलदगतीने होणार असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News: पुण्यात फायनान्स कंपनीविरोधात शिंदेसेना आक्रमक, शेतकऱ्याच्या घराचं सील तोडलं

Train Accident: २ प्रवासी ट्रेनची एकमेकांना धडक, आतापर्यंत ४ प्रवाशांचा मृत्यू; ८८ जण गंभीर जखमी

Monday Horoscope: या राशींच्या आयुष्यात होणार मोठे बदल! कोणाला मिळणार पैशांचा लाभ? वाचा राशिभविष्य

Weight Loss Tips : वजन कमी करण्याचं सिक्रेट; 5 पदार्थ दररोजच्या आहारातून करा हद्दपार

Khan Saree Designs: महिलांसाठी खणाच्या साड्यांच्या लेटेस्ट डिझाईन्स, हे 5 पॅटर्न्स दिवाळीत दिसतील उठून

SCROLL FOR NEXT