Crime News Saam Tv
क्राईम

Bengaluru Crime News : Anniversaryचं गिफ्ट न मिळाल्याने पत्नीने पतीला चाकूने भोसकलं; घटनेनं बेंगळुरू हादरलं

Bengaluru News : रागाच्या भरात तिने पतीवर चाकून हल्ला केला. पती रात्री घरी झोपलेला असाताना पत्नीने त्याच्या हातावर चाकू भोकसला. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.

Ruchika Jadhav

Wife Attack On Husband :

वाढदिवस प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील वर्षातला एक खास आणि स्पेशल दिवस असतो. लग्न झाल्यावर प्रत्येक जोडपं आपल्या लग्नाचा वाढदिवस देखील मोठ्या हौसेने साजरा करतात. अशात लग्नाचा वाढदिवस अनेक पुरुष मंडळी विसरून जातात. त्यामुळे पत्नीसोबत त्याचं हमखास भांडण होतं. मात्र लग्नाचा वाढदिवस विसरणं बेंगळुरूमधील एका पतीला चांगलंच महागात पडलं आहे.

दिवसभर वाट पाहूनही पतीने आपल्याला लग्नाच्या वाढदिवसांचं गिफ्ट दिलं नाही याचं पत्नीला फार वाईट वाटलं. या गोष्टीने ती फार दु:खी झाली. दु:खात तिला पतीचा रागही आला. त्यामुळे रागाच्या भरात तिने पतीवर चाकून हल्ला केला. पती रात्री घरी झोपलेला असाताना पत्नीने त्याच्या हातावर चाकू भोकसला. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.

चाकूने वार केल्यावर पतीच्या हाताला जखम झाली. त्याने लगेचच रुग्णालयात धाव घेतली. डॉक्टरांनी त्यावर योग्य ते उपचार करून त्याला घरी सोडलं आहे. पतीने याबाबत पोलीस ठाण्यातही तक्रार दाखल केली आहे. अधिक चौकशी करून सुरूवातीला पती-पत्नीचे समुपदेशन करणे गरजेचे असल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे.

पतीने आपल्या तक्रारीत पोलिसांना सांगितलं की, 27 फेब्रुवारी रोजी ही घटना घडली. रात्रीचे १.३० वाजले होते, पत्नी किचनमध्ये होती आणि मी झोपलो होतो. ती जेव्हा बाहेर आली तेव्हा तिच्या हातात एक चाकू होता. त्या चाकूने तिने माझ्यावर हल्ला केला.यावेळी मी तिला माझ्यापासून दूर ढकललं. तेव्हा तिच्या हातातला चाकू खाली पडला.

तितक्यात मी शेजारी राहणाऱ्या व्यक्तींना आवाज दिला. त्यांच्या मदतीने मी रुग्णालयात गेलो. त्यानंतर डॉक्टरांनी माझ्यावर उपचार केला, असं पतीने पोलिसांना सांगितलं. आता या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

पती-पत्नी दोघांमध्येही गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू आहेत. काही खासगी कारणांमळे पत्नी मानसीक तणावात आहे, असंही पतीने पोलिसांना सांगितलं आहे. पत्नीची बाजू ऐकून घेतल्यावर योग्या ती कारवाई केली जाईल, असं पोलिसांनी या प्रकरणी म्हटलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Famous Actor : प्रसिद्ध अभिनेत्याला मुंबईतून अटक; महिलेसोबत नको ते कृत्य केलं, नंतर...

Mumbai News: मुंबई महानगर पालिकेत मोठा प्रशासकीय फेरबदल, ८०० अभियंत्यांची तडकाफडकी बदल्या

Maharashtra News Live Update: दुष्काळग्रस्त भागांसाठी राज्य सरकार पावले उचलेल : सुनील तटकरे

महिलांनो! वजन लय वाढलंय? Weight Loss करण्यासाठी 'या' सवयी लगेच सोडा

Health Tips: दुप्पट वेगाने कमी होईल वजन; आहारात फक्त या एका गोष्टीचा करा समावेश, ३२ वरून २८ होईल कंबर

SCROLL FOR NEXT