Crime News  Saam TV
क्राईम

Crime News : श्रद्धा वालकर हत्याकांडाची पुनरावृत्ती; महिलेचे ३० तुकडे केले अन् फ्रिजमध्ये ठेवले

Bengaluru Crime News : महिलेच्या शरीराचे ३० तुकडे करून फ्रिजमध्ये भरून ठेवल्याची धक्कादायक घटना बेंगळुरूमध्ये घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ पसरलीये.

Ruchika Jadhav

श्रद्धा वालकर हत्याकांडाची पुनरावृत्ती घडली आहे. बेंगळुरूमध्ये एका तरुणीची हत्या करून तिचे ३० हून जास्त तुकडे करण्यात आलेत. नराधमाने तरुणीच्या शरीराचे तुकडे फ्रिजमध्ये भरून ठेवले होते. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तसेच महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बेंगळुरूच्या मल्लेश्वर परिसरात ही घटना घडली आहे. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी येथे धाव घेतली. पोलीस सध्या या घटनेचा तपास करत आहेत. तरुणीची हत्या ४ ते ५ दिवसांआधी झाल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. फॉरेन्सिक एक्सपर्टकडून देखील या ठिकाणी पाहणी करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हत्या झालेली महिला मुळची अन्य शहरतील आहे. आपल्या पतीपासून वेगळी झाली होती आणि गेल्या तीन महिन्यांपासून या शहरात राहत होती. तिचा पती शहरापासून दूर असलेल्या एका आश्रमात काम करतो. घटनेची माहिती मिळाल्यावर त्याने देखील येथे धाव घेतली. पोलिसांचं असं म्हणणं आहे की महिलेच्या ओळखीच्या आणि जवळच्या व्यक्तीनेच हे कृत्य केले असावे. पोलिसांनी महिलेच्या मृतदेहाचे तुकडे ताब्यात घेतले असून पुढील चौकशी सुरू आहे.

श्रद्धा वालकरची हत्या अन् ३५ तुकडे फ्रिजमध्ये

दरम्यान, १८ मे २०२२ रोजी देखील दिल्लीमध्ये अशीच एक भयंकर घटना घडली होती. श्रद्धा वालकरच्या लिव इन् पार्टनरने तिची हत्या केली होती. यावेळी त्याने श्रद्धाच्या शरीराचे थेट ३५ तुकडे केले होते आणि याचा वास येऊ नये म्हणून त्याने हे तुकडे ३०० लिटरच्या फ्रिजमध्ये सुद्धा भरून ठेवले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सोलापूरमधील चेट्टीनाड कंपनीच्या ट्रान्सफार्मरला भीषण आग

Todays Horoscope: आज या राशींनी ताण कमी करण्याचा प्रयत्न करावा, वाचा राशीभविष्य

Dhule Crime: लग्नसोहळ्यात चाकूने वार करत तिघांची निर्घृण हत्या, गुजरात बॉर्डरवरून ३ जणांना अटक; नेमकं काय घडलं?

सोशल मीडियावरील गुंतवणुकीच्या आमिषात अडकला मलेशियन दूतावासातील कर्मचारी; गमावले 78.85 लाख

Ahilyanagar Crime: १५ वर्षीय मुलीचं अपहरण करत बलात्कार, ५ दिवस जंगलात डांबून ठेवले अन्...; अहिल्यानगर हादरले

SCROLL FOR NEXT