Beed Crime News Saam Tv News
क्राईम

Beed Crime : बीडमध्ये पुन्हा गुंडाराज! जमिनीच्या क्षुल्लक वादातून तरुणाच्या डोक्यात वार, गावच्या माजी सरपंचाचा कारनामा

Beed Crime News : बीड जिल्ह्यामध्ये मारहाणीच्या घटना थांबायचं नाव घेत नाहीय. बीड ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील साक्षाळ पिंपरी येथे शेत जमिनीच्या वादावरून एका तरुणाला धारदार शस्त्राने डोक्यात मारहाण करण्यात आली आहे. ही मारहाण गावच्या माजी सरपंच यांनी केली आहे.

Prashant Patil

बीड : बीड जिल्ह्यामध्ये मारहाणीच्या घटना थांबायचं नाव घेत नाहीय. बीड ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतील साक्षाळ पिंपरी येथे शेत जमिनीच्या वादावरून एका तरुणाला धारदार शस्त्राने डोक्यात मारहाण करण्यात आली आहे. ही मारहाण गावच्या माजी सरपंच यांनी केली आहे. या मारहाणीमध्ये तरुण गंभीररित्या जखमी झाला असून त्याच्यावर बीडच्या खासगी रुग्णालय लोटस येथे विभागात उपचार सुरू आहे.

संबंधित तरुणाची प्रकृती चिंताजनक आहे. मात्र, पोलिसांकडून तक्रार दाखल करून घेण्यासाठी टाळाटाळ करत असल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. राजकीय दबावापोटी गुन्हा दाखल करून घेण्यात येत नसल्याचा आरोप कुटुंबीय करत आहेत. थेट कुटुंबीयांनी आज पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन न्यायाची मागणी केली आहे. पोलीस अधीक्षक यांना कुटुंबाने निवेदन दिलं आहे.

हॉटेल भाग्यश्रीच्या मालकाला जीवे मारण्याची धमकी

धाराशिव येथील तुळजापूरजवळील प्रसिद्ध हॉटेल भाग्यश्रीच्या मालकाला अज्ञात व्यक्तीकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. 'तुझे दिवस भरलेत, व्हिडीओ टाकू नकोस', असं म्हणत अज्ञात व्यक्तीने फोन करुन हॉटेल भाग्यश्रीचे मालक नागेश मडके यांना धमकावलं आलं आहे. या प्रकरणामुळे भाग्यश्री हॉटेल चर्चेत आलं आहे.

सोशल मीडियावर धुमाकूळ घालणाऱ्या हॉटेल भाग्यश्रीचे मालक नागेश मडके यांना अज्ञात व्यक्तीने फोन करुन जीवे मारण्याची धमकी दिली आहे. सोशल मीडियावर व्हिडीओ टाकू नकोस, आम्हाला तुला जीवे मारण्याची सुपारी मिळाली आहे. तुझे दिवस भरत आले आहेत, असे अज्ञातांनी नागेश मडके यांना फोनवर म्हटल्याची माहिती समोर आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: यवतमाळनंतर आता चिपळूणमध्येही टीडब्ल्यूजेच्या चार जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल

Face Care Tips: सॉफ्ट आणि ग्लोइंग स्किनसाठी सकाळी उठल्यावर चेहरा या घरातील सामग्रीने करा स्वच्छ, आठवड्याभरात दिसेल फरक

Cricket Shocking : क्रिकेट विश्वाला मोठा धक्का; टीम इंडियाच्या सुवर्ण क्षणाचा साक्षीदार काळाच्या पडद्याआड

Asia Cup : पाकिस्तान आशिया कपमधून बाहेर होणार, आकडेवारी सांगतेय कोण किती पाण्यात?

Wednesday Horoscope: नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी या राशीवर देवीचा विशेष आशीर्वाद; वाचा उद्याचे भविष्य

SCROLL FOR NEXT