police Saam tv
क्राईम

Beed News: मस्साजोगमधील 'त्या' अख्खा टोळीवर मकोका कारवाई, पोलिसांची बेधडक कारवाई

Beed News: मस्साजोग येथील आवादा एनर्जी प्रकल्पावर चोरी करणाऱ्या टोळीवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आलीय. तसेच निलंबित पोलीस अधिकारी रणजीत कासले यांच्याविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय.

Bharat Jadhav

बीडमधील मस्साजोग येथील आवादा एनर्जी प्रकल्प परिसरात चोरी करणाऱ्या टोळीवर पोलिसांनी बेधडक कारवाई केली आहे. मकोका अंतर्गत कारवाईचा प्रस्ताव पोलीस अधीक्षकांनी दिला आहे. एप्रिल महिन्यात आवादा एनर्जी प्रकल्प परिसरात एका टोळीकडून कॉपर चोरीचा प्रकार घडला होता. चोरीसह या टोळीने तेथील वॉचमनला मारहाण करून डांबून ठेवले होते.

या घटनेत पोलिसांनी तपास करून 10 आरोपींपैकी चार आरोपींना अटक केली. ही टोळी असून त्यांच्यावर विविध ठिकाणी 27 गुन्हे दाखल आहेत. याच अनुषंगाने या टोळीवर मकोका अंतर्गत कारवाई केली जाणार आहे. तर वादग्रस्त निलंबित पोलीस अधिकारी रणजीत कासले यांनी केलेल्या आरोप प्रकरणात चौकशी सुरू असून या चौकशीनंतर त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. तर आज शिवाजीनगर पोलीस ठाण्यात ॲट्रॉसिटी अंतर्गत कासले यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याचं पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी सांगितले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT