Beed Woman Beaten up Video Saam Tv News
क्राईम

Beed Crime : शिवराज दिवटेनंतर पुन्हा नवीन प्रकरण; बीडमध्ये न्यायालयाच्या परिसरातच महिलेला अमानुष मारहाण; संतापजनक VIDEO

Beed Woman Beaten up Video : अतिशय अमानुष मारहाण होत असताना या व्हिडिओमध्ये दिसत आहे. सदरील घटना बीड न्यायालय परिसराच्या समोर असलेल्या एका वकिलाच्या टेबलाजवळच झाली आहे.

Prashant Patil

बीड : परळीच्या लिंबोटा येथील रहिवासी असलेल्या शिवराज दिवटे या तरुणाला १० ते १५ जणांच्या टोळक्याने अमानुष मारहाण केली होती. या प्रकरणी परळी पोलिसांनी सात आरोपींना अटक केली आहे. त्याचदरम्यान, आता पुन्हा एक मारहाणीचा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत एका महिलेला न्यायालय परिसरातच मारहाण करत असल्याचं दिसत आहे. वकिलाच्या टेबलवर काही वेळ शाब्दिक बाचाबाची सुरू असल्याचं यामध्ये पाहायला मिळालं. यानंतर एका व्यक्तीने या महिलेला मारायला सुरुवात केली‌.

अतिशय अमानुष मारहाण होत असताना या व्हिडिओमध्ये दिसत आहे. सदरील घटना बीड न्यायालय परिसराच्या समोर असलेल्या एका वकिलाच्या टेबलाजवळच घडली आहे. सदरील व्हिडिओ दोन महिन्यांपूर्वीचा असल्याचं सांगितलं जातंय. ही मारहाण कुठल्या कारणावरून झाली हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. घरगुती वादावरून नवरा-बायकोत वाद झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. सुरुवातीला सदरील व्यक्तीला बायकोने आणखी एका महिलेसोबत मिळून मारहाण केल्याची ही मिळत आहे. मात्र बीड जिल्ह्यात मारहाणीच्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओंमुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे.

शिवराज दिवटे मारहाण प्रकरण

दरम्यान, परळीतील जलालपूर येथील मंदिरातील एका समारंभात पंगतीच्या कार्यक्रमात किरकोळ वाद झाल्यानंतर शिवराज दिवटे याचे अपहरण करुन त्याला मारहाण करण्यात आली होती. शुक्रवारी दुपारी हा प्रकार घडला होता. समाधान मुंडे आणि त्याच्या टोळक्याने शिवराजला टोकवाडी रस्त्यावरील डोंगरात माळावर नेऊन बेदम मारहाण केली. लाकडी दांडके, कत्ती आणि काठ्यांनी शिवराज दिवटे याला मारहाण करण्यात आली. सुदैवाने काही लोकांनी हा प्रकार बघितल्यामुळे शिवराज दिवटे याचा जीव वाचला.

शिवराज दिवटे याने पोलिसांना दिलेल्या जबाबानुसार, त्याला लोखंडी रॉड, कत्ती, बेल्ट आणि लाकडी दांडक्यांनी मारहाण करण्यात आली. या प्रकरणी परळी पोलिसांनी गुन्हा दाखल करुन तपासाला सुरुवात केली होती. आरोपींमध्ये समाधान मुंडे, रोहित मुंडे, आदित्य गीते, ऋषिकेष गिरी, प्रशांत कांबळे, सौमित्र शिंदे, सौमित्र गोरे, रोहन वागलकर, सुराज्य गित्ते, सूरज मुंडे यांचा समावेश आहे. इतर ११ अनोळखी तरुणांविरोधातही पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. शिवराज दिवटेला मारहाण करणाऱ्या टोळक्यात अनेकजण १८ ते १९ या वयोगटातील होते. हे सर्वजण टोकवाडी, डाबी, नंदागौळ, परळी येथील रहिवासी आहेत. आरोपींनी शिवराज दिवटेला मारहाण करतानाचा व्हिडीओ चित्रित करुन ते सोशल मीडियावर व्हायरल केले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Andheri News : मुंबईत रेल्वे स्टेशन परिसरात पार्किंग माफियांची मुजोरी; रेल्वेच्या नियमांना हरताळ, नागरिकांची सर्रास लूट

कोचिंग क्लासची पिकनिक जीवघेणी ठरली, रायगडमध्ये समुद्रात अकोल्यातील शिक्षकासह विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू

2026 मध्ये सोनं आणखी महागणार? महायुद्धानंतर शक्तिशाली नेता उदयास येणार?

Maharashtra Politics: शिवसेना भाजप संबंध तुटणार? ठाकरे- शिंदेंच्या युतीवर राणे आक्रमक

Sunday Horoscope : नातेवाईकांकडून लाभ मिळणार; 5 राशींच्या लोकांचे नशीब उजळणार, अफाट पैसा येणार

SCROLL FOR NEXT