Badlapur Case Update Saam TV
क्राईम

Badlapur Case Update : बदलापुरात अफवांचा सुळसुळाट; खोटी पोस्ट व्हायरल केल्याप्रकरणी आणखी 4 जणांवर गुन्हे दाखल

Badlapur Crime News : आंदोलनानंतर बदलापूर शहरात सध्या अफवांचा सुळसुळाट सुरू असल्याचं दिसत आहे. आज अफवा पसरवणाऱ्या आणखी ४ जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Ruchika Jadhav

अजय दुधाणे, बदलापूर

बदलापुरातील नामांकीत शाळेत लहान मुलींवर झालेल्या अत्याचाराविरोधात मंगळवारी जोरदार आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनानंतर बदलापूर शहरात सध्या अफवांचा सुळसुळाट सुरू असल्याचं दिसत आहे. आज अफवा पसरवणाऱ्या आणखी ४ जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, बदलापुरातील घटनेशी संबंधित काही अफवा या ४ जणांनी इंस्टाग्राम आयडीवर व्हायरल केल्या होत्या. अफवेतून पीडित कुटुंबाबाबत धक्कादायक माहिती पसरवण्यात आली होती. अशा अफवा पसरवणाऱ्या एकूण ५ जणांवर आत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पीडित मुलीच्या आईबद्दल पसरवले खोटे मेसेज

२ दिवसांपूर्वी बदलापूरमधील अल्पवयीन पीडित मुलगी आणि तिच्या आईच्या प्रकृतीविषयी खोटी माहिती पसरवणारा एक मॅसेज सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. पोस्ट सोशल मीडियावर टाकल्याप्रकरणी एका २१ वर्षीय तरुणीला या आधीच अटक करण्यात आलीये.

पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, रुतिका प्रकाश शेलार असं या तरुणीचं नाव आहे. ती चामटोली गावात राहणारी आहे. ठाणे सायबर सेलने या तरुणीचा शोध घेतलाय. आंदोलनानंतर बदलापूर शहरात तणापूर्ण शांतता होती. त्यावेळीच अफवा पसरवल्याने समाजात अशांतता पसरवल्याचा गुन्हा तरुणीवर दाखल करण्यात आलाय.

सहाय्यक पोलीस आयुक्त सुरेश वराडे यांनी या अफवांनंतर नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन केलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सरकारी रुग्णालयात मोठा घोटाळा! बोगस दिव्यांग प्रमाणपत्र प्रकरणात बड्या वैद्यकीय अधिकाऱ्याला अटक, मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश

Maharashtra News Live Update: झारखंडमधील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला आमचा पाठिंबा - अभिजीत दिपके

Konkan To Akkalkot : स्वामी भक्तांसाठी आनंदाची बातमी! कोकणातून अक्कलकोटसाठी थेट बससेवा सुरु; कुठून धावणार? तिकीट दर काय?

Heart Attack - High BP : हार्ट अटॅक अन् हाय बीपीचा धोका कमी करण्यासाठी 'या' बिया ठरतील वरदान

इन्शुरन्स नसेल तर पेट्रोल-डिझेलही मिळणार नाही? सुप्रीम कोर्टाच्या 'या' नव्या नियमाने देशभरात खळबळ

SCROLL FOR NEXT