Crime News Saam TV
क्राईम

Crime News: मेव्हणीच्या अल्पवयीन मुलीसोबत घृणास्पद कृत्य; पोलिसांत गुन्हा दाखल, काकाच्या आवळल्या मुसक्या

Chhatrapati Sambhajinagar: काकाने अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याने ती कुणाशीच काही बोलत नव्हती. आपल्या लेकीला अचानक काय झालं या विचाराने तिची आई देखील चिंतेत होती.

Ruchika Jadhav

रामू ढाकणे

Aurangabad Crime News:

छत्रपती संभाजीनगर येथून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. एका ५० वर्षीय व्यक्तीने मेव्हणीच्या अल्पवयीन मुलीसोबत अतिप्रसंग आणि दोन वेळा गैरवर्तन केलं. आपल्या मुलीला झालेला त्रास लक्षात येताच तिच्या आईने पोलीस ठाण्यात धाव घेतली. तसेच आरोपी काका विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

घटनेबाबत अधिक महिती अशी की, अल्पवयीन मुलगी काही दिवसांपूर्वी तिच्या मावशीकडे राहण्यासाठी आली होती. यावेळी घरात कोणी नसल्याचा फायदा घेत काकाने तिच्याशी गैरवर्तण केलं. त्यामुळे मुलगी सतत घाबरून राहत होती. काकाने अतिप्रसंग आणि गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केल्याने ती कुणाशीच काही बोलत नव्हती. आपल्या लेकीला अचानक काय झालं या विचाराने तिची आई देखील चिंतेत होती.

मुलीला काही त्रास होत आहे का? तिची तब्येत ठिक नाही का? याबाबत आईने तिच्याकडे चौकशी केली. मात्र चिमुकली काहीही सांगत नव्हती. शेवटी आईने तिला विश्वासात घेतलं आणि तिच्याशी बातचीत केली. त्यावेळी तिने घडलेली संपूर्ण घटना आपल्या आईला सांगितली.

घडलेली घटना ऐकून आईच्या तळपायाची आग मस्तकात गेली. नराधम काकाला शिक्षा झालीच पाहिजे म्हणून आईने थेट पोलीस स्टेशन गाठलं. घटलेली घटना पोलिसांना सांगितली त्यानंतर एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात काका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच पोलिसांनी या व्यक्तीला अटक देखील केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राज्यात मोठी खळबळ! तब्बल 70 टक्क्यांहून अधिक मंत्र्यांचा गेम होणार? कुणाला मिळणार संधी?

Ravindra Chavan : मराठी माणसाच्या नावावर राजकारण करणाऱ्यांनी आधी इतिहासात डोकवावं, रवींद्र चव्हाणांचा घणाघात

Maharashtra Live News Update : थोड्याच वेळात जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची घोषणा होणार

Crime: दारू पाजली, नंतर मफलरने गळा आवळा; शिर धडावेगळं केलं अन्...; महिलेने बॉयफ्रेंडच्या मदतीने नवऱ्याला संपवलं

ऐन निवडणुकीत हायव्होल्टेज ड्रामा; शिंदे गट-भाजपच्या कार्यकर्त्यांच्या हाणामारीला नवं वळण, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT