Chhatrapati Sambhaji Nagar News Saam TV
क्राईम

Crime News: कचरा वेचणाऱ्या महिलेने २ वर्षांचं बाळ उचलून नेलं; छत्रपती संभाजीनगरमधील धक्कादायक घटना

Sambhaji Nagar News: कचरा वेचणाऱ्या महिलेने २ वर्षाचे बाळ पळवल्याची धक्कादायक घटना छत्रपती संभाजीनगर शहरातील विश्रांतीनगर परिसरात रविवारी दुपारच्या सुमारास घडली.

Satish Daud

Chhatrapati Sambhaji Nagar News

दारात खेळणाऱ्या २ वर्षाच्या बाळाला कचरा वेचणाऱ्या महिलेने उचलून नेलं. मात्र, हा प्रकार शेजारच्या महिलेच्या लक्षात येताच तिने महिलेचा पाठलाग करत तिच्या तावडीतून बाळाची सुटका केली. ही धक्कादायक घटना छत्रपती संभाजीनगर शहरातील विश्रांतीनगर परिसरात रविवारी दुपारच्या सुमारास घडली. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली असून मुले पळवणारी टोळी आल्याची अफवा पसरली आहे. याप्रकरणी पुंडलिकनगर ठाण्यात महिलेसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी (Police) दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला आपल्या पती आणि २ वर्षाच्या बाळासह विश्रांतीनगर परिसरात राहते.

महिलेचा पती सेंट्रींगचे कामे करतो. दरम्यान, रविवारी पती कामावर गेला असताना, महिला घरकामात व्यस्त होती. तिचे २ वर्षाचे बाळ दारात खेळत होते. त्याचवेळी एक अनोळखी महिला तिथे आली. (Latest Marathi News)

आपल्याकडे कुणाचंही लक्ष नसल्याची खात्री होताच या महिलेने २ वर्षाच्या बाळाला घेऊन पळ काढला. दरम्यान, हा प्रकार शेजारी राहणाऱ्या एका महिलेच्या लक्षात आला. तिने तातडीने आरोपी महिलेचा पाठलाग करत बाळाची सुटका केली.

या घटनेनंतर बाळाच्या आईने पुंडलिकनगर ठाण्यात धाव घेतली. महिलेसह दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहेत. या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IPL 2026: प्रियांश-कॉनॉलीच्या वादळी खेळीपुढे लखनौचा संघ ढेर, पंजाब किंग्सच्या विजयाचा पंजा

Raqesh Bapat: आधी लग्न मोडलं मग ब्रेकअप; बिग बॉस फेम राकेश बापटच्या लव्हलाईफमध्ये मोठा गोंधळ

Bigg Boss Marathi 6 Winner : अर्ध्यावर सोडली मालिका अन् थेट बिग बॉसमध्ये एन्ट्री, 'टास्क क्वीन'चा प्रवास कसा होता?

Bigg Boss Marathi 6: नशिबाचा गेम पालटला; राकेश बापट ठरला उपविजेता; तर, तन्वी कोलतेने जिंकली बिग बॉस मराठी ६ची ट्रॉफी

Bigg Boss Marathi 6 Winner : तन्वी कोलतेनं उचलली 'बिग बॉस मराठी ६' ची ट्रॉफी; राकेश बापटला दिली मात, बक्षिसात काय काय मिळाले? VIDEO

SCROLL FOR NEXT