Ganja Seized In Panvel  Yandex
क्राईम

Panvel News: कारमधून गांजाची तस्करी,12 लाख 24 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त; अमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई

Ganja Seized In Panvel: अमली पदार्थ विरोधी पथकाने पनवेलमध्ये लाखोंचा गांजा पकडला आहे. त्यामुळे शहरात मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांची तस्करी होत असल्याचं समोर आलं आहे.

Rohini Gudaghe

सिद्धेश म्हात्रे

Panvel Crime News

पनवेल शहरात अमली पदार्थांचा वावर वाढला आहे. नवी मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने (Anti Narcotics Squad) एका कारमधून सुमारे 12 लाख 24 हजार रुपयांचा गांजा जप्त केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी गांजा विक्री करणाऱ्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी एकाला अटक केली आहे, तर दुसऱ्या आरोपीचा शोध सुरू आहे. (Latest Crime News)

नवी मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने मुंबई गोवा महामार्गावर पाठलाग करत पळस्पेजवळ ही कारवाई (Ganja Seized In Panvel) केली आहे. वाहनामध्ये 12 लाख 24 हजार रुपये किमतीचा गांजा लपवून गोव्याला घेऊन जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्याआधारे पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

छत्रपती संभाजीनगरमधील कारवाई

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील ढोरेगाव शिवारात असलेला हॉटेल महाराष्ट्र हायवे ढाब्याजवळ एक व्यक्ती बेकायदेशीररित्या स्कुटीवर गांजा घेऊन जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली (Crime News) होती. त्यानंतर गंगापूर पोलिसांनी त्याला सापळा लावून अटक केली आहे. राहुल राजेश जाधव (राहणार शिर्डी), असं ताब्यात घेतलेल्या आरोपीचं नाव आहे.

त्याच्याकडून २८ किलो १५० ग्राम गांजा तसेच वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली दुचाकी असा एकूण ४ लाख ७२ हजार रुपयांचा मुद्देमाल गंगापूर पोलिसांनी जप्त केला आहे. दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी त्याच्यावर गुन्हाही दाखल केला आहे.

पुणे शहरातील कारवाई

फेब्रुवारी महिन्यात पुण्यामध्ये तीन उच्चशिक्षीत तरूणांना अटक करण्यात आली होती. ते गांजा विक्री करत असल्याचं समोर आलं होतं. त्यांच्याकडून २७ किलो अमली पदार्थ जप्त करण्यात आले होते. यातील एक तरूण धुळ्यातील होता. ६ फेब्रुवारी रोजी पोलिसांनी ही कारवाई केली होती.

पुण्यातील कात्रजजवळ आंबेगाव बुद्रूक परिसरात पोलिसांनी ही कारवाई केली होती. गांजा विक्री करण्यासाठी आलेल्या स्थापत्य अभियंत्यासह ३ उच्चशिक्षित तरुणांना गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली होती. या तरुणांकडून २७ किलो गांजासह (Ganja) तीन मोबाईल देखील जप्त करण्यात आले होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! ८-९ जुलैला राज्यातील कोणतीही शाळा बंद नाही, शिक्षण विभागाने काढले आदेश

IND vs ENG : भारताचं खातं उघडलं, इंग्लंडचं गर्वहरण, मालिकेत बरोबरी; शुभमन गिलच्या यंग ब्रिगेडनं करुन दाखवलं

Monday Horoscope : बोलण्यापेक्षा कृतींवर लक्ष द्या; 'या' राशींच्या लोकांची भरभराट होणार

मस्क यांचा नवा पक्ष 'अमेरिका पार्टी', उद्योगपती मस्कही उतरणार राजकारणात; ट्रम्प यांच्या वादानंतर मस्क यांचा मोठा निर्णय

Ind Vs Eng 2nd Test : इंग्लंडचा अभेद्य किल्ला भेदला, ५८ वर्षांनी वनवास संपवला; गिलसेनेने बर्मिंगहॅममध्ये इतिहास रचला

SCROLL FOR NEXT