Akshay Shinde Encounter 
क्राईम

Akshay Shinde Encounter: बदलापूर प्रकरपणातील आरोपी अक्षय शिंदे नेमका कोण? वाचा

Akshay Shinde Encounter: बदलापूर अत्याचापर प्रकरणातील आरोपीची मृत्यू पोलीस चकमकीत झाल्याने राज्यात खळबळ उडालीय.

Bharat Jadhav

बदलापूरमधील एका शाळेतील अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा पोलीस चकमकीत मृत्यू झालाय. पोलीस आज तळोजा तुरुंगातून त्याचा ताबा घेत त्याला ठाण्याकडे आणत होते. त्याचवेळी त्याने पोलिसांची बंदूक हिसकावण्याचा प्रयत्न केला त्यानंतर पोलिसांवर गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांनी आपल्या बचावासाठी त्याच्यावर गोळीबार त्याला ठार केले. या चकमकीवरून आता राज्यातील वातावरण तापलं असून त्याला राजकीय वळण मिळू लागलंय.

मुलींवर अत्याचार झाल्याची घटना घडल्यानंतर बरेच दिवस झाले तरी आरोपीवर कारवाई केली गेली नव्हती. यामुळे पोलिसांवर आणि राज्य सरकारवर टीका केली जात होती. अक्षयला १७ ऑगस्ट रोजी अटक करण्यात आली होती. आरोपीला अटक केल्यानंतर बदलापूरमधील नागरिकांनी त्याला फासीची शिक्षा द्यावी अशी मागणी केली होती. बदलापूरमधील नागरिकांनी या मागणीसाठी जवळपास १० ते १२ तास रेले रोको आंदोलन केलं होतं.

आज ट्रन्जिट रिमांडसाठी त्याला तळोजा तुरुंगातून बदलापूरला आणलं जात होतं. त्यावेळी त्याने पोलिसांकडील बंदूक हिसकावून घेत पोलिसांवर गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पोलिसांनी आपल्या बचावासाठी त्याचावर गोळीबार केला. यात अक्षयचा मृत्यू झाला. मात्र यावर शंका उपस्थित केली जात आहे. दरम्यान बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे होता कोण? हे जाणून घेऊ.

कोण होता अक्षय शिंदे

अवघ्या ४ वर्षांच्या मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप अक्षयवर होता. ठाणे जिल्ह्यातील बदलापूर शहरातील एका नामांकित शाळेतील दोन मुलींचं लैंगिक शोषण झाले होते. ही घटना १२ ऑगस्ट रोजी घडली होती. याप्रकरणी अक्षयला अटक करण्यात आली होती. अक्षय शिंदे हा या शाळेत सफाई कर्मचारी होता. त्याने शाळेच्या शौचालयामध्ये दोन साडेचार वर्षाच्या चिमुकल्या मुलींवर अत्याचार केला होता.

अक्षय शिंदेला शाळेने सफाई कामगाराची नोकरी दिली होती. एका सफाई कंपनीला कंत्राट देऊन संबंधित शाळेने ऑगस्ट २०१५ मध्ये कामावर घेतलं होतं. अक्षय शिंदे २४ वर्षांचा असल्याची माहिती मिळतेय. तो मुंबईपासून ५० किलोमीटर अंतरावर राहत होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check : सर्व सरकारी बँका शनिवारी राहणार बंद; काय आहे व्हायरल सत्य? जाणून घ्या

Maharashtra Dry Day : महाराष्ट्रात उद्या ड्राय डे! किती वाजेपर्यंत दुकाने बंद राहणार? वाचा

Maharashtra News Live Update: दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना महाराष्ट्रातील दीड लाख राजपत्रित अधिकारी देणार एक दिवसाचे वेतन

Leftover Chapati Storage Tips: रात्री उरलेल्या चपात्या फ्रिजमध्ये ठेवाव्या की नाही? शिळ्या होऊ नये म्हणून 5 सोप्या टिप्स वापरा

मोठा राजकीय भूकंप! जिगरी मित्रपक्षच देणार भाजपला धक्का; सत्ताधारी पक्षासोबत आघाडीत सहभागी होणार

SCROLL FOR NEXT