Akola Crime Saam Tv
क्राईम

Akola Crime News: वाहनाचा कट लागला अन् भयंकर घडलं; तरुणाला भररस्त्यातच संपवलं, अकोल्यातील खळबळजनक घटना

Youth Killed Telhara Incident: अकोला जिल्ह्यातील तेल्हारा गावात धक्कादायक घटना घडली आहे. वाहनाचा कट लागला म्हणून वाद झाला. रागाच्या भरात तरूणाचा खून केल्याची घटना घडली आहे.

Rohini Gudaghe

अक्षय गवळी

Akola Crime Youth Killed

वाहनाचा कट लागल्याच्या शुल्लक कारणावरुन अकोला जिल्ह्यात लाठ्या-काठ्या मारून एका तरुणाची हत्या केल्याची धक्कादायक घटना ( Crime News) समोर आली आहे. देवानंद उत्तम तायडे (वय 28) असं हत्या करण्यात आलेल्या तरुणाचं नाव आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. आपण या घटनेबाबत सविस्तर जाणून घेऊ या. (Latest Crime News)

हिवरखेड़ पोलिसांनी याप्रकरणी तात्काळ कारवाई केली आहे. याप्रकरणी त्यांनी गुन्हा दाखल केला आहे. मारेकऱ्यांना अटक करण्याची कारवाई सुरू आहे. जिल्ह्यातील हिवरखेड पोलीस स्टेशन हद्दीतील दानापूर गावात काल रात्रीच्या सुमारास ही घटना घडली (Akola Crime) आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

वाहनाचा कट लागल्याच्या कारणावरुन हत्या

हिवरखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गोविंद पांडव यांनी दिलेल्या माहितीनुसार, तेल्हारा (Telhara) तालुक्यातील दानापुर गावात काल रात्री साडेआठ ते नऊ वाजताच्या सुमारास मृत देवानंद उत्तम तायडे हा दुचाकीनं घरी जात होता. तेव्हा त्याच्या वाहनाचा कट रस्त्यात उभ्या असलेल्या काहीजणांना लागला. यावरून चांगलाच वाद पेटला. हा वाद हत्येपर्यंत (Youth Killed) पोहोचला.

वाहनाचा धक्का लागल्याने देवानंदला मोठ्या प्रमाणात शिवीगाळ या तरूणांनी केली होती. या वादानंतर संतापलेल्या चार ते पाच जणांनी मिळून देवानंदच्या छातीवर आणि पाठीवर तसेच डोक्यावर जोरदार लाठी-काठीने वार करून त्याला जखमी केलं होतं. गंभीर अवस्थेत रस्त्यावर पडलेल्या देवानंदला स्थानिक ग्रामस्थांनी तातडीने उपचारासाठी जवळील रुग्णालयात दाखल (Akola Crime News) केलं. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. घटनेनंतर देवानंदचे मारेकरी घटनास्थळावरून पसार झाले होते.

आरोपींचा शोध सुरू

या घटनेची माहिती हिवरखेड पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठले. अन् घटनास्थळाचा पंचनामा करून देवानंदचा मृतदेह अकोल्याच्या (Akola) शासकीय पाठविण्यात आला आहे. मृतदेहाची वैद्यकीय तपासणी सुरू आहे. तसेच याप्रकरणी हिवरखेड पोलिसांत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मारेकऱ्यांचा शोध घेण्यात येत आहे.

लवकरच सर्व आरोपींना अटक करण्यात येईल, असं पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. दरम्यान आरोपींना शोधण्यासाठी पोलिसांनी पथक नेमण्यात आल्याचं म्हटलं आहे. वाहनाचा कट लागल्याच्या अगदी शुल्लक कारणावरुन देवानंदची हत्या (Youth Killed In Akola) झाली आहे. आपल्या मुलाची हत्या झाल्याचं समजताच कुटुंबीयांना धक्का बसला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shaktipeeth Expressway :'शक्तीपीठ' ठरणार पांढराहत्ती? शेतकऱ्यांचं नुकसान, शेकडो गावांना फटका बसणार; राजू शेट्टींनी सांगितले विकासाचे अडथळे

Satara News: थरारक! साताऱ्यातील खंबाटकी घाटात ट्रकचा जळून कोळसा; वाहतूक ठप्प, VIDEO

IMD Rain Alert : महाराष्ट्रातील कोकण, विदर्भ, मराठवाडासह देशभरात ७ दिवस मुसळधार पावसाचा इशारा

Hindi Language Controversy: मला मराठी येत नाही, ताकद असेल तर महाराष्ट्रातून हाकलून द्या; केडियानंतर राज ठाकरेंना अभिनेत्याचं ओपन चॅलेंज

Maharashtra Politics : राज ठाकरे संपूर्ण भाषणात कुठेही 'ते' वाक्य बोलले नाही; एकनाथ शिंदेंच्या बड्या नेत्याचा थेट मुद्द्याला हात

SCROLL FOR NEXT