Crime News Saam Tv
क्राईम

Crime News : अकोला हादरलं, शिक्षकाने शाळेतच ६ मुलींचा केला विनयभंग, अश्लील व्हिडिओ दाखवत छळ!

Akola Crime News : अकोल्यात एका शिक्षकाकडून सहा विद्यार्थीनींचा छळ... अश्लील Video दाखवत केला सहा मुलींचा विनयभंग

Namdeo Kumbhar

अक्षय गवळी, साम प्रतिनिधी

Akola Crime News : बदलापूरच्या शाळेत दोन मुलीवर लैगिंक अत्याचार केल्याचे पडसाद राज्यभर उमटले आहेत. सर्वच स्तरातून निषेध व्यक्त करण्यात येतो. बदलापूरकर रस्त्यावर उतरले होते. राज्य सरकारने याप्रकरणी कारवाई केली आहे. बदलापूर प्रकरणामुळे राज्यात संताप व्यक्त होत असतानाच अकोल्यातली एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. शिक्षकानेच सहा विद्यार्थीनींसोबत अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघड झाल आहे.

अकोला जिल्ह्यातल्या बाळापूर तालुक्यात हा संतापजनक प्रकार समोर आलाय. काजीखेड येथे जिल्हा परिषदेच्या उच्च माध्यमिक शाळेत एका शिक्षकाने अश्लील व्हिडिओ दाखवत सहा विद्यार्थीनींचा छळ केल्याची घटना समोर आली. या घटनेमुळे अकोला हादरलाय. ही खळबळजनक घटना आज मंगळवारी संध्याकाळी उघडकीस आली. याप्रकाराने जिल्हाभरात सर्वत्र संताप व्यक्त होत आहे.

काजीखेड येथे जिल्हा परिषदच्या उच्च माध्यमिक शाळेतील प्रमोद सरदार नामक शिक्षकाने हे कूकर्म केलेय. त्याने आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थीनींना अश्लील व्हिडिओ दाखवत छळ केला. अश्लील चित्रफित दाखवत असताना त्याने मुलींना वाईट पद्धतीने स्पर्श करत अश्लील संभाषण केले. हा प्रकार मागील चार महिन्यांपासून सुरू असल्याचा आरोप या शिक्षकांवर विद्यार्थीनींनी केला आहे.

आज मंगळवारी पीडित विद्यार्थिनींनी या घटनेसंदर्भात पालकांना सांगितल्यानंतर त्यांना धक्का बसलाय. त्यानंतर संतप्त झालेल्या पालकांनी उरळ पोलिसांकडे धाव घेत शिक्षकांविरोधात तक्रार दाखल केली. याप्रकरणी उरळ पोलिसांनी शिक्षकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान विद्यार्थिनीचा विनयभंग करणारा शिक्षक प्रमोद सरदार याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

दरम्यान या संपूर्ण प्रकारावर राज्य महिला आयोगाच्या माजी सदस्य आशा मिरगे यांनी या शिक्षकांवर कठोर कारवाईची मागणी केली..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hindi Language Row: आर्थिक गणित जुळवण्यासाठी व्यापाऱ्यांना त्रास, खंडणी नाही दिली म्हणून...; प्रताप सरनाईकांचे मनसैनिकांवर गंभीर आरोप|VIDEO

Nashik Crime : लूटमारीच्या उद्देशातून हत्या; चामर लेणी येथील ट्रक चालकाच्या खुनाचा उलगडा

Pune MNS : 'ठाण्याचा वाघ गुजरातच्या पिंजऱ्यात'; पुण्यात मनसेचं आंदोलन, एकनाथ शिंदेंचा केला निषेध

Maharashtra Live News Update: ठाण्याचा वाघ गुजरातच्या पिंजऱ्यात; पुण्यात मनसेकडून एकनाथ शिंदेंचा निषेध

Raj Thackeray: राज ठाकरेंच्या बापाचा महाराष्ट्र आहे का? भाजपचे माजी प्रवक्ता नवीन जिंदाल यांचं ट्विट | VIDEO

SCROLL FOR NEXT