Solapur Crime News Saam Tv
क्राईम

Crime News : दारूसाठी पैसे दिले नाहीत, शेजारी संतापला, डोक्यात कुऱ्हाड घालून केली हत्या

Solapur Crime News : सोलापुरात दारूसाठी पैसे न दिल्याने कुऱ्हाडीने हल्ला करून तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरु केला आहे.

Alisha Khedekar

  • सोलापुरात दारूसाठी पैसे न दिल्याने मित्रांकडून तरुणाची कुऱ्हाडीनं निर्घृण हत्या

  • मृत तरुणाचे नाव यतिराज शंके असून आरोपी आकाश बलरामवाले आणि नवल खरे आहेत

  • घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे

  • पोलिसांनी गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरु केला आहे

काही दिवसांपूर्वी कोल्हापुरात तरुणाने दारूसाठी पैसे न दिल्याने आईची हत्या केली. त्यानंतर आता सोलापूरमध्ये दारूसाठी पैसे न दिल्याने एका तरुणाची डोक्यावर कुन्हाडीनं हल्ला करून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. ही घटना शुक्रवारी रात्री ११ च्या सुमारास घडली आहे. या घटनेबाबत पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मृत तरुणाचे नाव यतिराज दयानंद शंके असे आहे. तर आरोपींची नावं आकाश तुळजाराम बलरामवाले आणि नवल खरे अशी आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, सदर घटना सोलापुरातील गरिबी हटाव झोपडपट्टी नं. १ येथे शुक्रवारी रात्री ११ च्या सुमारास घडली. आकाश तुळजाराम बलरामवाले आणि नवल खरे हे दोघे यतिराज शंके यांच्याकडे दारूसाठी पैसे मागत होते. मात्र शंके यांनी पैसे देण्यास नकार केला. तरीही आकाश आणि नवल यांनी शंके यांच्याकडे पैशांसाठी जबरदस्ती केली. तरीही शंके यांनी पैसे देण्यास नकार दिल्याने या तिघांमध्ये वाद निर्माण झाला. या वादातून तिघांमध्ये हाणामारी झाली.

या हाणामारीनंतर आकाश बलरामवाले याने घरात जाऊन कुन्हाड घेऊन आला आणि त्याने शंके यांच्या डोक्यावर वार केला. यात शंके गंभीर जखमी झाले. या घटनेनंतर शंके यांची पत्नी प्रतिभा यतिराज शंके यांनी तातडीने जखमी यतिराज यांना रुग्णालयात दाखल केले. मात्र त्यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.

शंके यांच्या विजापूर नाका पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदला आहे. पोलिसांनी या प्रकरणी घटनास्थळी दाखल होत तपास सुरु केला आहे. दरम्यान या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच शंके यांच्या हत्येनंतर कुटुंबात हळहळ व्यक्त केली जात आहे. मात्र आता या तिघांना कोणती शिक्षा होणार हे पाहणं महत्वाचं ठरेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पाटोदा येथे मुंबई दौऱ्यातील पहिल्या मुक्कामाची जय्यत तयारी सुरू आहे

Patole Recipe : केळीच्या पानांत वाफवलेल्या गोड पातोळ्या; जाणून घ्या साधी सरळ रेसिपी

80s Style Shirt Designs: ८०s शर्ट डिझाइन्स पुन्हा ट्रेंडमध्ये! 'या' ७ रेट्रो स्टाइल्सने मिळवा हटके आणि स्टायलिश लूक

India Fort : तीन रहस्यमयी दरवाजे असलेला ऐतिहासिक किल्ला, प्रत्येक द्वारामागे दडलीय वेगळी गोष्ट

Amit Shah: समान नागरी कायद्यावर केंद्राचा मोठा निर्णय; मुंबईत अमित शहांनी केली घोषणा

SCROLL FOR NEXT