Police Arrested Motorcycle Theft Saam Tv
क्राईम

Ahmednagar Crime: मोटरसायकल चोरी करणाऱ्या सराईत आरोपीला बेड्या; १० लाख रुपये किंमतीच्या दुचाकी जप्त

Ahmednagar Crime: पोलीस स्टाफसह इगतपुरी येथे तपासणीसाठी गेले. त्या गुन्ह्यातील संशयित शंकर एकनाथ गांगड राहणार उबाडे, तालुका इगतपुरी याला ताब्यात घेऊन त्यास पोलिसांच्या खाक्या दाखवल्यानंतर त्याने राजुर शेंडी येथील दोन बुलेट त्याच्या साथीदारासोबत येऊन चोरी केल्याची कबुली दिली.

Bharat Jadhav

Ahmednagar Police Arrested Motorcycle Theft :

महागड्या मोटरसायकल चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारास अटक करण्यास राजुर पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी त्याच्याकडून तब्बल १० लाख ८० हजार रु. किमतीच्या महागड्या १० मोटरसायकल जप्त केल्या. याबाबत राजुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राजुर शेंडी आणि अन्य ठिकाणच्या मोटरसायकली या चोरीला गेलेल्या असताना या पार्श्वभूमीवर राजूर आणि शेंडी गावातील सीसीटीव्ही फुटेज तसेच गोपनीय बातमीदाराने दिलेल्या माहितीनुसार गुन्ह्याचा तपास सुरू करण्यात आला.

पोलीस स्टाफसह इगतपुरी येथे तपासणीसाठी गेले. त्या गुन्ह्यातील संशयित शंकर एकनाथ गांगड राहणार उबाडे, तालुका इगतपुरी याला ताब्यात घेऊन त्यास पोलिसांच्या खाक्या दाखवल्यानंतर त्याने राजुर शेंडी येथील दोन बुलेट त्याच्या साथीदारासोबत येऊन चोरी केल्याची कबुली दिली. त्यावरून सदर गुन्ह्यातील दोन्ही बुलेट मोटरसायकल सदर आरोपींकडून जप्त करण्यात आल्या.

तसेच आरोपीस विश्वासात घेतले असता त्याच्याकडे इतर मोटर सायकलबाबत चौकशी केली असता त्याने इतर पोलीस स्टेशन हद्दीतील मोटर सायकल चोरी केले बाबतची माहिती दिली. त्यावरून त्यांच्याकडून १० मोटरसायकली असा एकूण १० लाख ८० हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर आरोपीने राजुर पोलीस स्टेशन शहापूर पोलीस स्टेशन ग्रामीण अंबड पोलीस स्टेशन नाशिक अशा पोलीस स्टेशनमधून या गाड्या चोरी केल्याचे निष्पन्न झाले आहे.

वर्ध्यातही पोलिसांची कारवाई

'यूट्यूब'वर दुचाकी चोरीचे व्हिडिओ पाहून ठिकठिकाणी दुचाकी चोरी करणाऱ्या टोळीच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. दुचाकी चोरी प्रकरणी वर्धा जिल्ह्याच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या प्रॉपर्टी सेल पथकाने दोघांना अटक केली. पोलिसांनी त्यांच्याकडून चोरीतील चार दुचाकी असा ९५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. पोलिसांनी रितिक श्रीराम वाघाळे (२२) प्रणिकेत केशव नागोसे (१९) अशी अटक केलेल्या चोरट्यांची नावे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जळगावात पुन्हा भीषण अपघात टँकरच्या धडकेत आयटीआय विद्यार्थ्याचा मृत्यू; दोन जखमी

Sugar price hike: एका महिन्यात साखर तब्बल २९ टक्क्यांनी महागली, आता केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय; काय आहे नवा नियम?

Taj Mahal: ताजमहालच्या तळाशी 42 विहिरी का आहेत? काय आहे त्यांचं रहस्य?

Bollywood Actor : हृतिक रोशनशी व्हायची तुलना, प्रियंकासोबत केलंय काम! ओळखूही येत नाहीये 'हा' प्रसिद्ध अभिनेता, VIDEO तुफान व्हायरल

Idli- Dosa For Diabetes: डायबिटीजचे रूग्ण इडली, डोसा खाऊ शकतात का? जाणून घ्या ब्लड शुगर कंट्रोलमध्ये राहण्यासाठी काय खावे?

SCROLL FOR NEXT