Ahmednagar Crime News  Saam Digital
क्राईम

Ahmednagar News: शाळकरी विद्यार्थिनीवर अत्याचार, पीडिता ८ महिन्यांची गरोदर; अहमदनगरमधील धक्कादायक घटना

Vishal Gangurde

सचिन बनसोडे, अहमदनगर

Ahmednagar Latest News:

अहमदनगरमध्ये हादरवणारी घटना घडली आहे. नववीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. पीडित मुलगी ८ महिन्यांची गरोदर झाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. अहमदनगरमधील श्रीराम तालुक्यात हा प्रकार घडला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, अहमदनगर जिल्ह्याच्या श्रीरामपूर तालुक्यात नववीत शिकणाऱ्या मुलीवर धमकी देऊन वारंवार अतिप्रसंग केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मुलगी आठ महिन्यांची गरोदर झाल्यानंतर हा प्रसंग उघडकीस आला आहे.

पीडित मुलीच्या वडिलांना जिवे मारण्याची धमकी देऊन अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सध्या या पीडित मुलीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

आरोपीच्या मुसक्या आवळल्या

शाळकरी विद्यार्थिनीवर अत्याचार करणाऱ्या आरोपींवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. अल्पवयीन मुलीच्या अत्याचार प्रकरणी श्रीरामपूर पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच आरोपीला मदत करणाऱ्यालाही ताब्यात घेतलं आहे.

या प्रकरणात अत्याचार करणारा आरोपी फरार आहे. पोलीसांकडून आरोपीचा पोलीसांकडून शोध सुरू आहे. दोघांविरोधात पोक्सो कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंबईत शाळेच्या वॉचमनचा ४ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार

मुंबईतील मालाडमध्ये ४ वर्षीय मुलीवर अत्याचार झाल्याचीही घटना घडली आहे. शाळेच्या वॉचमनने शाळकरी मुलीवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. मालाडच्या मालवणी परिसरातील अंबुजवाडी येथे ही घटना घडली आहे. या प्रकरणी आरोपी वॉचमनला याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. मोहम्मद अन्सारी असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

EPFO: UAN नंबर विसरलात? टेन्शन सोडा, या सोप्य स्टेप्स फॉलो करुन जाणून घ्या

Jalna Accident: जालन्यात बस- ट्रकचा भीषण अपघात! ५ ते ६ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती

iPhone 16 चा सेल सुरू, 67500 रुपयांपर्यंतची ऑफर; किंमत, ऑफर आणि खरेदीचे ठिकाण वाचा सर्वकाही

Maharashtra News Live Updates: मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, उपचार घेण्यास नकार

Sambhajinagar Corporation : पाणी पुरवठ्यासाठी करणार सौरऊर्जेचा वापर; शंभर एकर जागेवर संभाजीनगर महापालिका उभारणार प्रकल्प

SCROLL FOR NEXT